‘हवामान बदलाचा बोजा सर्वानी मिळून पेलावा’
By admin | Published: December 13, 2014 02:46 AM2014-12-13T02:46:11+5:302014-12-13T02:46:11+5:30
भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांनाही या आव्हानाच्या निवारणात महत्त्वाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे.
Next
लीमा : कार्बन उत्सजर्न घटवण्यात औद्योगिक देशांनी मोठी भूमिका बजावायलाच हवी. तथापि भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांनाही या आव्हानाच्या निवारणात महत्त्वाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. हवामान बदलाच्या मुकाबल्याचे ओङो सर्वानी मिळून पेलण्याचे आवाहनही त्यांनी जागतिक नेत्यांना केले.
पेरूची राजधानी लीमात सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेत केरी बोलत होते. या परिषदेला 19क् हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. हवामान बदल व त्याचे विध्वसंक परिणामांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह लावणा:या अमेरिकी राजकारण्यांना फटकारताना केरी म्हणाले की, ‘तुम्हाला यासाठी पीएच.डी.ची आवश्यकता नाही. जग बदलण्यास एव्हाना सुरवात झाली असून तुम्हाला त्याकडे केवळ लक्ष देण्याची गरज आहे.
कोणताही एकटा देश एवढेच नाहीतर अमेरिकाही एकटय़ाने ही समस्या सोडवू शकणार नाही. ते बोलण्याएवढे सोपे नाही, असेही ते म्हणाले. जर अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाने डझनभर झाडे लावली. जर आम्ही येनकेनप्रकारे देशातील कार्बन उत्सजर्न थांबवू शकलो तर? तर काय? हे देखील जगाच्या इतर भागातून होणारे कार्बन उत्सजर्नाचे परिणाम रोखण्यास पुरेसे नाही. चीन किंवा भारत या दोघांपैकी कोणी एकाने उत्सजर्न शुन्य स्तरावर आणले तरी परिस्थिती बदलणार नाही.
(वृत्तसंस्था)