हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:51 PM2020-08-16T12:51:54+5:302020-08-16T12:58:18+5:30
जगाच्या तापमानात 1 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. यामुळे ही तापमान वाढ मलेरियास डेग्यू सारख्या रोगांची वाहक बनली आहे.
पॅरिस : सध्या जगाला हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर डेंग्यु, झिकासारखे जुने-सुप्त व्हायरस पुन्हा परतण्याचा युरोपला धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
हे संकट एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे वाटू शकते. परंतू, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे व्हायरस, साथीचे रोग गंभीर बनत चालले आहेत. कोरोनाने जगावर मोठे संकट आणले आहे. यामुळे आजवर 760,000 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. जंगलावर मानवी अतिक्रमनामुळे हे सारे घडत आहे, असा अशारा संशोधकांनी दिला आहे.
परिणामी कोरोनासारखीच अन्य मोठी संकटे ओढवणार आहेत. जगाच्या तापमानात 1 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. यामुळे ही तापमान वाढ मलेरियास डेग्यू सारख्या रोगांची वाहक बनली आहे. देवी, शीतज्वरासारखे उत्पात माजविलेले व्हायरस पुन्हा परतण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. स्वीडनच्या उमीया विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजीच्या संशोधक बिर्गिट्टा इव्हनगार्ड यांनी सांगितले की, मानवाने त्याची हद्द पार केली आहे. यामुळे आपले भविष्य कठीण दिसू लागले आहे. आपणच आपले शत्रू बनत चाललो आहोत. आपला मोठा शत्रू हा दुर्लक्ष करणे हा आहे.
हवामान बदलाचा हा टाईम बॉम्ब रशिया, कॅनडा आणि अलास्काच्या भागात पसरू लागला आहे. कारण या भागात जगात जेव्हा इंडस्ट्रीचा उगम झाला तेव्हापासून तिप्पट कार्बन उत्सर्जन झाले आहे. जर मनुष्यवस्तीने 2015 च्या पॅरिस करारानुसार तापमान दोन डिग्री सेल्सिअसने कमी केले तर हा ध्रुव प्रदेशातील उघडी पडलेली जमीन 2100 पर्यंत पुन्हा बर्फाच्छादीत होईल असे युएनच्या हवमाना पॅनेलने म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार
BOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; अर्जासाठी राहिलेत फक्त काही तास
TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज
भयावह! देशात कोरोनाबळींचा आकडा 50000 समीप; दिवसभरात 63 हजार नवे रुग्ण
मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही
चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज
SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटचा दिवस