सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेचा तुर्कस्थानातील दूतावास बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 10:44 PM2018-03-05T22:44:51+5:302018-03-05T22:44:51+5:30
अमेरिकेने तुर्कस्थानची राजधानी अंकारा येथे असणारा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेतून प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात म्हटले आहे.
अंकारा- अमेरिकेने तुर्कस्थानची राजधानी अंकारा येथे असणारा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेतून प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात म्हटले आहे. अर्थात आणीबाणी प्रसंगी तात्काळ लागणार्या सेवा व मदत दिली जाणार असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेने आपल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे व दूतावासाजवळ गर्दी करणे टाळा असे सांगितले असून, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्या स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्या अशा सूचना केल्या आहेत. मात्र अमेरिकन दूतावास, अमेरिकन पर्यटक, लोक यांना कोणत्या प्रकारचा धोका आहे, याबाबत कोणतेही स्पष्ट विधान यामध्ये करण्यात आलेले नाही.
US Embassy in Turkey shut for unspecified ‘security threat’ https://t.co/BCHdTrKBjbpic.twitter.com/skOiYKIm48
— The Times of Israel (@TimesofIsrael) March 5, 2018
व्हिसासाठी होणा-या मुलाखती व इतर सुविधा सोमवारीच थांबवण्यात आल्या असून दूतावासाचे कामकाज पूर्णतः सुरू झाल्यावरच लोकांना व्हिसा मुलाखतींची सोय उपलब्ध होणार आहे. या दूतावासावर २०१३ साली आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका तुर्की सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. सीरियाच्या समस्येमुळे अमेरिका आणि तुर्कस्थान यांचे संबंध पुन्हा ताणले गेले आहेत.
US embassy in Turkey closed over security fears https://t.co/1jrBigNyKYpic.twitter.com/wqx5lxQrYg
— RT (@RT_com) March 4, 2018