आसामवरही महापुराचे ढग; चीन ब्रह्मपुत्रेमध्ये सोडणार पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 08:50 PM2018-08-30T20:50:25+5:302018-08-30T21:14:16+5:30
नदीमधील पाण्याची पातळी गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वाधिक स्तरावर आहे.
नवी दिल्ली : भारताला प्रत्येकवेळी संकटात टाकणाऱ्या चीनने आता पाण्याच्या रुपात आणखी एक संकट उभे केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून हे पाणी लवकरच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सोडणार असल्याचा इशारा चीनने दिला आहे. यामुळे आसाममध्ये पूर येण्याची शक्यता आहे.
चीनच्या इशाऱ्य़ानंतर आसामच्या डिब्रूगडमधील अधिकाऱ्यांना जिल्हा मुख्यालय न सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. चीनने जर नदीमध्ये पाणी सोडले तर पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे आसाममध्ये महापुराचा धोका उद्भवू शकतो. अरुणाचल प्रदेशचे खासदार निनोंग एरिंग यांनीही पुराचा इशारा दिला गेला असल्याचे सांगितले.
#Assam: Officers of Dibrugarh district have been asked not to leave the district headquarters in the view of release of excess water by Chinese govt, that may cause unprecedented rise in the water level in the river Brahmaputra, there by causing severe flood.
— ANI (@ANI) August 30, 2018
अरुणाचल प्रदेशच्याही सरकारला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून येते. चीनमध्ये तिला सांग्पो या नावाने ओळखले जाते. सध्या या नदीमधील पाण्याची पातळी गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वाधिक स्तरावर आहे. यामुळे चीन पाणी सोडण्याची शक्यता जास्त आहे.
एका करारानुसार चीन ब्रह्मपुत्रेमध्ये पाणी सोडण्याबाबतचे इशारे मे ते ऑक्टोबर दरम्यान देतो. यामुळे तेथील राज्यांना सतर्क करता येते. मात्र, गेल्या वर्षीच्या डोकलाम वादामुळे चीनने हे इशारे देणे बंद केले होते. मात्र, यंदा पुन्हा चीनने इशारा देत भारताला सावध केले आहे.