दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी

By admin | Published: June 14, 2016 04:32 AM2016-06-14T04:32:13+5:302016-06-14T04:32:13+5:30

दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी

Collective efforts should be made to destroy terrorism: Mukherjee | दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी

दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी

Next

अक्रा : दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताचा पाठिंबा जाहीर करताना मुखर्जी बोलत होते. मुखर्जी यांचे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले आहे. ते म्हणाले,‘गेल्या तीन दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरला
आहे. दहशतवाद जागतिक संकट बनल्याची घानाची भावना योग्य आहे.’ घानाचे अध्यक्ष जॉन
ड्रॅमिनी महामा यांनी रविवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात मुखर्जी म्हणाले, ‘दहशतवादाला ना कोणती सीमा आहे ना कोणता विचार. विचारधारा आहे ती हेतुपुरस्सर विध्वंसाची. तुम्ही या संकटाला तोंड देत आहात. भारत त्यात तुमच्यासोबत आहे.’

Web Title: Collective efforts should be made to destroy terrorism: Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.