पक्षाची विमानाशी जोरदार टक्कर, रहिवासी भागात कोसळले विमान, पहा VIDEO...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 03:29 PM2022-09-18T15:29:28+5:302022-09-18T15:30:37+5:30
रहिवासी भागात कोसळलेल्या विमानामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान
विमानाला पक्षाची टक्कर झाल्याने अनेकदा विमान कोसळल्याच्या घटना घडतात. अशाच प्रकारची एक घटना अमेरिकेच्या नौदलाच्या विमानासोबत घडली आहे. प्रशिक्षणादरम्यान अमेरिकन नेव्हीचे विमान पक्ष्याच्या धडकेमुळे रहिवासी भागात कोसळले. या अपघातात अनेक घरांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातापूर्वी वैमानिक विमानातून बाहेर पडले होते.
Terrifying footage has emerged of the moment a bird gets sucked into the engine of a US military jet, causing it to malfunction and crash into a Texas neighbourhood last year. #9Newspic.twitter.com/jJMardDnw0
— 9News Australia (@9NewsAUS) September 18, 2022
सप्टेंबर 2021 मध्ये घडलेल्या या घटनेचा एक नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमानाच्या पुढच्या बाजूला बसवलेल्या आरशावर एक पक्षी आदळतो आणि काही मिनिटांतच विमान कोसळते. फॉक्स न्यूजनुसार, ही घटना गेल्या वर्षी 19 सप्टेंबर रोजी घडली होती. विमानात वरिष्ठ पायलटसह प्रशिक्षणार्थी वैमानिक उपस्थित होते.
पक्षी विंडशील्डला आदळल्याने वैमानिकाचे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटले. व्हिडिओमध्ये पायलट आपत्कालीन स्थितीत असून विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ऐकू येत आहे. पण काही मिनिटांनी विमान कोसळतं. सुदैवाने अपघात होण्यापूर्वीच दोन्ही पायलट विमानातून बाहेर पडतात आणि जीव वाचवतात.