Shocking! बंजी जम्पिंगची इच्छा पडली महागात, एका चुकीमुळे हवेतच झाला तरूणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:27 PM2021-07-23T12:27:34+5:302021-07-23T12:28:26+5:30
झालं असं की, उडी घेतल्यावर महिलेच्या लक्षात आलं की, तिने बंजी कॉर्डच घातलेला नाही. ज्यामुळे तिला धक्का बसला आणि हार्ट अटॅक आला.
कोलंबियामद्ये (Colombia) काही थरारक करण्याच्या प्रयत्नात एका २५ वर्षीय तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. बंजी जम्पिग (Bungee Jumping) ची आवड असणाऱ्या महिलेने १६० फूट उंचावरून उडी घेतली, पण हवेतच तिला हृदय विकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. झालं असं की, उडी घेतल्यावर महिलेच्या लक्षात आलं की, तिने बंजी कॉर्डच घातलेला नाही. ज्यामुळे तिला धक्का बसला आणि हार्ट अटॅक आला.
थेट जमिनीवर पडली
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, येसेनिया मोरालेस गोम्ज (Yecenia Morales Gomez) नुकतीच १६० फूट उंच पुलावर बंजी जम्पिंग करण्यासाठी गेली होती. तिथे इन्स्ट्रक्टरच्या एका सिग्नललाच ती उडी घेण्याचा सिग्नल समजली आणि तिने उडी घेतली. त्यानंतर तिला जाणवलं की, तिने बंजी कॉर्डच लावलेला नाही. कुणाच्या काही लक्षात यायच्याआधी येसेनिया जमिनीवर आदळली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
आधी असं समजलं जात होतं की, येसेनिया मोरालेस गोम्जचा मृत्यू जमिनीवर आदळल्याने झाला. पण मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की, येसेनियाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, जमिनीवर पडण्याआधीच येसेनियाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. व्यवसायाने वकिल असलेली येसेनिया बॉयफ्रेन्डसोबत बंजी जम्पिंगसाठी पहिल्यांदाच गेली होती.
बॉयफ्रेन्डला दिला होता उडीचा सिग्नल
मीडिया रिपोर्टनुसार, इन्स्ट्रक्टरने येसेनियाच्या बॉयफ्रेन्डला उडी घेण्यासाठी सांगितलं होतं. पण तिला वाटलं की, इन्स्ट्रक्टरने तिलाच उडी घेण्याचा सिग्नल दिला आणि तिने उडी घेतली. घटनेनंतर फायर फायटरच्या मदतीने येसेनियाला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.