हाय सिक्युरिटी जेलमधून फरार झाला ड्रग माफिया, CCTV फुटेज झालं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:54 PM2022-03-24T17:54:24+5:302022-03-24T17:56:18+5:30

Colombian Drug Lord Escaped : जुआन कास्त्रो माताम्बा हा एक कुख्यात ड्रग लॉर्ड्सपैकी एक आहे. माताम्बाला गार्डच्या कपड्यात बोगोटातील पिकोटा तुरूंगातून बाहेर पडताना बघण्यात आलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. 

Colombia : Drug mafia escape from the high security jail cctv footage | हाय सिक्युरिटी जेलमधून फरार झाला ड्रग माफिया, CCTV फुटेज झालं व्हायरल

हाय सिक्युरिटी जेलमधून फरार झाला ड्रग माफिया, CCTV फुटेज झालं व्हायरल

Next

कोलंबियाच्या (Colombia) बोगोटामध्ये गेल्या शुक्रवारी एक कोलंबियन ड्रग माफिया(Colombian Drug Lord) अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरूंगातून फरार झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जुआन कास्त्रो माताम्बा हा एक कुख्यात ड्रग लॉर्ड्सपैकी एक आहे. माताम्बाला गार्डच्या कपड्यात बोगोटातील पिकोटा तुरूंगातून बाहेर पडताना बघण्यात आलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. 

ड्रग माफियाला गेल्यावर्षी मे महिन्यात राजधानीच्या ला पिकोटा तुरूंगात कैद करण्यात आलं होतं. आणि तो अमेरिकेच्या प्रर्त्यापर्णाची प्रतिक्षा करत होता. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेत कास्त्रो दरवाज्यातून बाहेर जाताना दिसत आहे. चेहरा झाकण्यासाठी त्याने हुडी जॅकेट घातलं आहे. 

तो काही दरवाजे पार करत बाहेर आला आणि सहजपणे हाय सिक्युरिटी असलेल्या तुरूंगातून फरार झाला. बीबीसीनुसार, एका जेलरला त्याच्य पळून जाण्यात मदत करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तुरूंगाच निर्देशक आणि ५५ इतर गार्ड्सनाही निलंबित करण्यात आलं आहे.

स्थानिक वृत्तपत्र एल टिएम्पोनुसार, कास्त्रो जवळपास १२.३० वाजता आपल्या सेलमध्ये बाहेर आला आणि एका सुरक्षा गार्डचा ड्रेस घालून तुरूंगातून पळून गेला. असं मानलं जात आहे की, हाय सिक्युरिटी तुरूंगातून फरार होण्यासाठी मातम्बाने ५ मिलियन डॉलरची लाच दिली असेल. याबाबत ठोस माहिती नाही.
 

Web Title: Colombia : Drug mafia escape from the high security jail cctv footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.