"यही समय है सही, समय है..."! PM मोदींचं पॅरीसच्या भूमीवरून फान्समधील भारतीयांना भावनिक अन् मोठं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:54 AM2023-07-14T00:54:54+5:302023-07-14T00:55:23+5:30
"आता सांगतोय, नंतर तक्रार करू नका की, मोदींनी सांगितलंच नव्हतं. आताच संधी आहे आणि मी तर लाल किल्यावरूनही सांगितले होते. 'यही समय है सही, समय है'."
सध्या भारतात गुंतवणुकीची अभूतपूर्व संधी निर्माण होत आहे. आपण भारतात गुंतवणूक करा. आता सांगतोय, नंतर तक्रार करू नका की, मोदींनी सांगितलंच नव्हतं. आताच संधी आहे आणि मी तर लाल किल्यावरूनही सांगितले होते. 'यही समय है सही, समय है'. जो लवकर पोहोचेल त्याला अधिक फायदा होईल. जो उशरा येईल तो वाट पाहील. आता, संधी किती लवकर घ्यायची? हे मी तुमच्यावर सोडतो. त्यामुळे लवकर या आणि भारतात गुंतवणूक करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले आहे. ते पॅरीसमध्ये बोलत होते.
मोदी म्हणाले, माझा आपल्या आग्रह आहे की, आता आपल्याला भारतात गुंतवणुकीसाठीही संपूर्ण उत्साहाने समोर यावे लागेल. भारत पुढील २५ वर्षांत विकसित होण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यात आपली भूमीकाही मोठी आहे. आपण ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत असाल. त्याच्याशी संबंधित संभावनांवर भारतात काम करा.
भारत सरकार परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी कमिटेड -
भारत सरकार परदेशात स्थाईक झालेल्या आणि येथे काम करत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेसाठीही कमिटेड आहे. लढाईचे मैदान असो वा एखादी नैसग्रिक आपदा, भारत भारतीयांना संकटात पाहताच सर्वात पहिले अॅक्शनमध्ये येतो. आम्ही भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण ताकत लावली आहे. परदेशात राहणारा भारतीय आमच्यासाठी तेवढेच महत्वाचा आहेत. जेवढा भारतात राहणारा भारतीय. असेही मोदी म्हणाले.
फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्यांना मिळणार पाच वर्षांचा पोस्ट स्टडी व्हिसा -
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये, अनेक भारतीय लोक संशोधनाशी जोडले गेले आहेत. आता त्यांना भारतीय इन्स्टिट्यूशन्समध्ये शिकविणे सुलभ करण्यात आले आहे. तसेच, फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताकडून पाच वर्षांसाठी पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात येईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले. याच बरोबर, भारतात येण्याचा अर्थ हजारो वर्षांचा वासरा अनुभव करणे आहे, असेही मोदी म्हणाले.
मी परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला भारताचा राजदूत मानतो -
मोदी म्हणाले, जेव्हा जग आपले कौतुक करते तेव्हा भारत मातेलाही मोठा आनंद होतो. मी परदेशात राहणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला भारताचा राजदूत मानतो. याशिवाय, मला माहीत आहे. भारतीय कुठे जरी असेल तरी ते भारतासाठीच विचार करतात. आपण येथे आहात पण आपले मन चंद्र यानाकडे लागले आहे, असेही मोदी म्हणाले.