मोदींची चीनवर नाव न घेता टीका
By admin | Published: September 2, 2014 02:02 AM2014-09-02T02:02:23+5:302014-09-02T02:02:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव न घेता काही देशांच्या विस्तारवादी वृत्तीबद्दल खेद व्यक्त केला. जपानशी चीनचा सागरी किना:यावरून वाद सुरू आहे.
Next
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव न घेता काही देशांच्या विस्तारवादी वृत्तीबद्दल खेद व्यक्त केला. जपानशी चीनचा सागरी किना:यावरून वाद सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी काही देश इतरांच्या समुद्रावरही अतिक्रमण करतात, असे म्हटले.
मोदी सोमवारी भारत व जपानच्या व्यावसायिक नेत्यांशी बोलत होते. सगळ्या जगाने हे स्वीकारले आहे की, 21 वे शतक हे आशियाचे आहे; परंतु ते कसे असावे, हा माझा प्रश्न आहे व याचे उत्तर आम्ही दिले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
हे उत्तर आमचे संबंध (भारत व जपान) किती कळकळीचे व पुरोगामी आहेत यावरू ठरेल. जपान व चीन यांच्यात पूर्व चीनमधील बेटांवरून तणाव आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
चीनची सावध प्रतिक्रिया
बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काही देशांच्या विस्तारवादी प्रवृत्तीच्या उल्लेखावर चीनने सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी यांनी भारत व चीन हे लष्करी भागीदार असल्याच्या मताचा दाखला दिला. मोदी यांनी केलेल्या वरील वक्तव्याबद्दल विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते किन गँग यांनी वरील भाष्य केले. ते म्हणाले, मोदी यांनी नेमके कशाच्या संदर्भात वरील भाष्य केले हे मला माहिती नाही; मात्र मोदी असे म्हणाले होते की, भारत व चीन हे राष्ट्रांच्या विकासासाठी भागीदार आहेत.