कंपनीचे 80 कोटी रूपये महिलेने जुगारात उडवले, खुलासा झाला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:13 PM2023-02-18T12:13:40+5:302023-02-18T12:14:01+5:30

महिला वकिल सारा जॅकलीन किंग कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काउंटी शहरात राहणारी आहे. ती ब्रिटीश वर्जिन आयलॅंडवर असलेल्या एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये काम करत होती.

Company employee female lawyer wasted 80 crores in gambling and party | कंपनीचे 80 कोटी रूपये महिलेने जुगारात उडवले, खुलासा झाला आणि मग....

कंपनीचे 80 कोटी रूपये महिलेने जुगारात उडवले, खुलासा झाला आणि मग....

googlenewsNext

एका महिलेने कंपनीने तब्बल 80 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम पार्टी करणे आणि जुगार खेळण्यात उडवली. महिला व्यवसायाने वकिल आहे. तिचा हा कारनामा समोर आल्यावर कंपनीला धक्का बसला. कंपनीने महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेला आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी कंपनीने 20 दिवसांचा वेळ दिला आहे.

महिला वकिल सारा जॅकलीन किंग कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काउंटी शहरात राहणारी आहे. ती ब्रिटीश वर्जिन आयलॅंडवर असलेल्या एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये काम करत होती. सारावर आरोप आहे की, तिने कंपनीची रक्कम आपल्या खाजगी स्वार्थासाठी खर्च केली. साराविरोधात 11 फेब्रुवारीला गुन्हा नोंदवण्यात आला. 

एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडने दावा केला आहे की, सारा लास वेगासला गेली. इथे एका आलिशान क्लब रिसॉर्टमध्ये थांबली. या दरम्यान ती लागोपाठ जुगार खेळली आणि स्ट्रीप क्लबमध्येही गेली होती.

सारावर जानेवारी महिन्यातच संशय आला होता. तेव्हा समजलं होतं की, तिने लोनबाबत काहीतरी गडबड केली आहे. एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडने काइंड लेडिंगला 80 कोटीपेक्षा जास्त किंमतीचे एकूण 97 लोन दिले होते. चौकशीतून समोर आलं की, जे लोन देण्यात आलं ते खोट्या कागदपत्रांसाठी वापरण्यात आलं होतं. यादरम्यान समोर आलं की, यामागे साराचा हात आहे. सारानेच ही सगळी रक्कम खर्च केली. 

असाही दावा करण्यात आला की, साराचा एक्स हसबंड मोरक्कोला गेला. असं मानलं जात आहे की, या फसणुकीमध्ये कथितपणे त्याचाही हात आहे. पण या केसमध्ये त्याचं नाव नाहीये.

Web Title: Company employee female lawyer wasted 80 crores in gambling and party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.