भारताच्या तुलनेत अमेरिकेत किती महागाई? तांदूळ आठ पट महाग, तर इतर अत्यावश्यक वस्तू....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:09 PM2022-11-29T16:09:01+5:302022-11-29T16:11:18+5:30
Inflation: रिपोर्टनुसार २३ लाख रुपयांमध्ये जी लाईफस्टाईल तुम्ही भारतात जगू शकता. अमेरिकेमध्ये याच लाईफस्टाईलसाठी ८० लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच भारताच्या तुलनेत अमेरिकेमध्ये त्याच सुविधा चार पट महाग आहेत.
नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून संपूर्ण जग महागाईमुळे त्रस्त आहे. आर्थिक मंदीमध्ये फसलेल्या ब्रिटनमध्ये महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. अमेरिकेत ऑक्टोबर महिन्यात महागाई कमी झाली आहे. मात्र अजूनही अत्यावश्यक वस्तू अजूनही महाग आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये उदरनिर्वाह करणे महागले आहे. अमेरिकेतील महागाईने अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांची स्वप्ने महाग केली आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे भारतीयांचं अमेरिकेत जाण्याचं स्वप्न महाग केलं.
रिपोर्टनुसार २३ लाख रुपयांमध्ये जी लाईफस्टाईल तुम्ही भारतात जगू शकता. अमेरिकेमध्ये याच लाईफस्टाईलसाठी ८० लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच भारताच्या तुलनेत अमेरिकेमध्ये त्याच सुविधा चार पट महाग आहेत. रिपोर्टनुसार अमेरिकेमध्ये ज्या वस्तू तुम्ही ५० डॉलर खर्च करता (सुमारे ४ हजार रुपये) त्याच वस्तू भारतात तुम्हाला सरासरी ११५० रुपये खर्चावे लागू शकतात. मात्र अमेरिकेमध्ये कमावलेले पैसे भारतात खर्च करणे आधीच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरेल.
अमेरिकेतील आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क आणि भारतातील आर्थिक केंद्र मुंबई येथे विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठा फरक आहे. मुंबईत एक कप कॉफीसाठी सरासर २०३.१५ रुपये खर्च करावे लागतात. तर हीच कॉफी अमेरिकेत ४३९.०६ रुपयांना मिळते. भारतात ज्या तांदळासाठी ३१.३८ रुपये मोजावे लागतात. तेच तांदूळ अमेरिकेत २९४.६८ रुपयांना मिळता. अमेरिकेत एक किमी टॅक्सीचा प्रवास करण्यासाी २४४ रुपये मोजावे लागतात. मात्र भारतामध्ये एवढंच अंतर कापण्यासाठी ४०.२३ रुपये मोजावे लागतात. न्यूयॉर्कमध्ये चित्रपट पाहण्यासाठी १४७० रुपये मोजावे लागतात. तर भारतात तुम्ही ३५० रुपये खर्च करावे लागतात.