ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केल्याप्रकरणी इसमाने स्वत:विरोधात दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 06:14 PM2018-01-17T18:14:57+5:302018-01-17T18:27:07+5:30
या इसमाला नशा इतकी जास्त झाली की त्याला फोनवर बोलणंही कठीण झालं होतं. त्याही परिस्थितीत त्याने पोलिसांना फोन केला.
फ्लॉरिडा : तुम्ही एखादा नियम मोडलात तर कधी स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधीन झाला आहात का? मुळात नियम मोडणारे कधीच स्वत:ची चुक कबूल करत नाहीत. पण फ्लॉरिडामध्ये एक प्रकार असा घडलाय जो ऐकून तुम्हाला प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे यावर विश्वास बसेल. एक इसम ड्रंक आणि ड्राईव्ह करत होता आणि त्याविरोधात त्यानेच स्वत:ची तक्रार केली आहे. सध्या हा फोनकॉल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
इतर गुन्हेविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतल्या फ्लॉरिडा शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला मिशेल लेस्टर हे दारू पिऊन गाडी चालवत होते. खूप प्रमाणात दारू प्यायल्याने त्यांना गाडी चालवणं अवघड झालं होतं. तसंच दारु पिऊन गाडी चालवणं नियमबाह्य असल्याने पोलिसांनी अटक करण्याआधी आपणच पोलिसांच्या स्वाधिन झालं पाहिजे यासाठी त्यांनी ९११ या इमरजन्सी क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या महिलेने तुम्ही कोणत्या संकटात सापडला आहात असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी दारू पिऊन गाडी चालवत आहे. त्यांना दारूची नशा एवढी चढली होती की फोनवर नीट बोलताही येत नव्हतं. त्यामुळे समोरच्या महिलेला सतत प्रश्न विचारावे लागत होते. त्यानंतर हळूहळू त्या इसमाने आपण दारू पिऊन गाडी चालवत असल्याची कबुली दिली. आपल्या चुकीची स्वत:हून कबुली दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर ऑपरेटरने विचारलं की, “तुम्ही कुठे आहात?’ तेव्हा ते म्हणाले की, ‘मला काहीच माहिती नाही, मी कुठे आहे. मला प्रचंड नशा चढली असून मला कसलंच भान नाहीए.’ दारूच्या नशेत ते रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गाडी चालवत असल्याचंही अनेकांनी पाहिलं. अपघात होऊन कोणालाही इजा होऊ नये याकरताच त्यांनी इमरजन्सी क्रमांकावर संपर्क साधला. त्यामुळे पुढे होणारी दुर्घटना टळली. पाहा व्हिडीयो -
आणखी वाचा - VIDEO : भारतातल्या ‘या’ ठिकाणी डोळे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो सेफ्टी पिन
पोलिसांनी मिशेल यांना अटक केली असून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेला गाडी चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिशेल यांचा फोनकॉलही सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलाय. इतरांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करू नये याकरता हा व्हिडिओ टाकला असला तरीही अनेक नेटिझन्सने या फोनकॉलवर हास्याची झोड उठवलीय.