युनो राबविणार व्यापक मोहीम

By admin | Published: April 27, 2015 11:16 PM2015-04-27T23:16:24+5:302015-04-27T23:16:24+5:30

संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात युनो भूकंपग्रस्त नेपाळसाठी व्यापक पातळीवर मदत मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे.

A comprehensive campaign to unite the world | युनो राबविणार व्यापक मोहीम

युनो राबविणार व्यापक मोहीम

Next

जिनिव्हा : संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात युनो भूकंपग्रस्त नेपाळसाठी व्यापक पातळीवर मदत मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे. युनोशी संलग्न संयुक्त राष्ट्र अन्नधान्य संस्थेचे पहिले विमान मंगळवारी नेपाळला पोहोचेल.
संयुक्त राष्ट्र जागतिक अन्नधान्य कार्यक्रमाचे प्रवक्ता एलिजागेथ बेयर्स यांनी सांगितले की, हा प्रचंड मोठा कार्यक्रम असेल. नेपाळमधील ही सर्वांत मोठी विनाशकारी आपत्ती आहे, असे मानले जाते.
नेपाळमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असून या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या संस्थेद्वारे परिसरातील सर्व भांडारांमध्ये समन्वय साधला आहे. रविवारी अन्नधान्य घेऊन येथून पहिले विमान नेपाळला रवाना झाल्याचे बेयर्स यांनी सांगितले.
वैद्यकीय साहित्यास प्राधान्य
संयुक्त राष्ट्र नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात मदत पोहचविण्यासाठी लवकरच आपत्कालीन आवाहन मोहिम सुरू करणार आहे. संघटनेचे विशेषतज्ज्ञ मदतीशी संबंधित गरजांच्या मुल्यांकनासाठी शनिवारी काठमांडूला दाखल झाले होते. निवारा आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवणे हे संघटनेच्या प्राधान्यक्रमावर असेल.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, तीन महिन्यापर्यंत नेपाळमध्ये ४० हजाराहून अधिक लोकांच्या आरोग्य गरजा भागविण्यासाठी अगोदरच वैद्यकीय पथक पाठविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

४काठमांडू : सुमारे १० लाख मुलांना नेपाळमधील भूकंपाचा मोठा फटका बसला असून यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेशी संलग्न युनिसेफच्या प्रवक्त्याने सांगितले. हजारो नेपाळींना उघड्यावर वा तंबूत रात्र काढावी लागत आहे. पाण्याशी संबंधित रोग आणि संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर कार्यकर्ते लक्ष ठेवून असल्याचे युनिसेफद्वारे सांगण्यात आले. सध्याच्या माहितीनुसार भूकंपाचा आतापर्यंत तब्बल १० लाख मुलांना फटका बसला आहे.

४स्वच्छ पाणी आणि शौचालयाची व्यवस्था पुरविणे हा आमच्या अजेंड्यावरील पहिला मुद्दा आहे. देशात सध्या पाणी आणि अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा आहे, असे युनिसेफने सांगितले.

 

Web Title: A comprehensive campaign to unite the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.