रशियात अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक

By admin | Published: June 12, 2017 04:05 PM2017-06-12T16:05:21+5:302017-06-12T16:05:21+5:30

रशियामध्ये अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक करण्यात आल्याचं वृत्त आहे. रशियाचे आरोग्य मंत्री व्लादिमीर शूलडयाकोव यांनी

Compulsory testing of minor girls in Russia is compulsory | रशियात अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक

रशियात अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक

Next
>ऑनलाइन लोकमत
 मॉस्को , दि. 12 - रशियामध्ये अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. रशियाचे आरोग्य मंत्री व्लादिमीर शूलडयाकोव यांनी डॉक्टरांना 16 वर्षांखालील सर्व मुलींची कौमार्य चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.  रशियाच्या इनव्हेस्टिगेटिव्ह समितीने 16 वर्षांखालील मुलींच्या लैंगिक सक्रियतेबद्दल पुरावे गोळा करण्यास सांगितलं आहे. "द इंडिपेंडेंट"ने याबाबत वृत्तच दिलं आहे. 
 
या आदेशामुळे येथील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे. डॉक्टरांपासून राजकारण्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घाबरून किशोरावस्थेत असलेल्या मुली गरज असतानाही डॉक्टरांकडे जाणार नाहीत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.   
 
दुसरीकडे या आदेशाचं पालन करावंच लागेल असं रशिय़ाच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कौमार्य चाचणीची सर्व माहिती शिवाय गर्भपात, आणि गर्भधारणेबद्दलची सर्व माहिती  पोलिसांना दिली जावी असे आदेश त्यांनी दिले आहेत. 
 
काही महिन्यांपूर्वीच रशियामध्ये घरगुती हिंसेला गुन्ह्याच्या श्रेणीतून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर जगभरातून रशियावर टीका झाली होती. 
 
 

Web Title: Compulsory testing of minor girls in Russia is compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.