‘भविष्यात गायब होणार कॉम्प्युटर’
By admin | Published: May 1, 2016 01:43 AM2016-05-01T01:43:03+5:302016-05-01T01:43:03+5:30
भविष्यात कॉम्प्युटरचा वापर संपुष्टात येईल, असे गुगलला वाटते. त्यानुसार कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या मते एक दिवस कॉम्प्युटर ‘फिजिकल डिव्हाईस’ राहणार नाहीत.
Next
वॉशिंग्टन : भविष्यात कॉम्प्युटरचा वापर संपुष्टात येईल, असे गुगलला वाटते. त्यानुसार कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या मते एक दिवस कॉम्प्युटर ‘फिजिकल डिव्हाईस’ राहणार नाहीत.
पिचाई यांनी गुरुवारी पॅरंट कंपनी अल्फाबेटच्या शेअर होल्डरना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कॉम्प्युटरबाबत हे भाकीत वर्तविले आहे.सध्या स्मार्टफोनच्या टच स्क्रीनवर बहुतेक आॅनलाईन अॅक्टिव्हिटी होत आहेत; पण पिचाई यांच्या मते आर्टिफिशिल इंटिलेजिन्सद्वारे आकारहीन कॉम्प्युटर्सचा विकास होत आहे. (वृत्तसंस्था)