युरोपात परिस्थितीत सुधारणा, अमेरिकेतही रुग्णसंख्या घटू लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:44 AM2021-05-07T06:44:45+5:302021-05-07T06:45:23+5:30
अनलॉक : अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटू लागली
न्यूयॉर्क / पॅरिस : अमेरिका, ब्रिटन, इस्रायल आणि अन्य यूरोपीय देशात कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे अनेक देशांत निर्बंधात सूट देण्यात येत आहे. युरोपात लसीकरणाचा वेग वाढल्याने नवे रुग्ण घटले आहेत; तसेच मृतांची संख्याही कमी झाली आहे.
अमेरिकेत नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. यूरोपातील पर्यटन उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. हा उद्योग पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या लोकांनी पूर्ण लसीकरण केले आहे, त्यांना आता या देशात प्रवासासाठी परवानगी मिळू शकते. अर्थात, संबंधित प्रवाशाच्या देशातील कोरोनाची परिस्थितीही यावेळी पाहिली जाणार आहे. फ्रान्समध्ये उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. देशांतर्गत प्रवासावरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत.
देश सक्रिय रुग्ण
अमेरिका ६६,९२,७८२
भारत ३५,६६,३९८
ब्राझिल ९,९२,२४७
फ्रान्स ८,७१,५७३
तुर्की ३,२४,२१०
रशिया २,७०,५४४
इंग्लंड ६०,४५७
इटली ४,०७,१२९
देश सक्रिय रुग्ण
स्पेन २,३९,७७०
जर्मनी २,७७,५५५
इराण ४,७८,४२०
द. आफ्रिका २३,२७९
पाकिस्तान ८४,१७२
नेपाळ ६६,३५२
श्रीलंका १६,७२०
बांगलादेश ५५,२०१