या देशात सोन्यापेक्षाही महाग आहे कंडोम, एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 02:41 PM2022-06-12T14:41:20+5:302022-06-12T14:41:51+5:30

Condom Price: असाही एक देश आहे जिथे गर्भधारणा टाळण्यासाठी वापरला जाणारा कंडोम हा प्रचंड महाग आहे. येथे कंडोमच्या एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजारापर्यंत आहे. म्हणजेच भारतात एक तोळा सोन्यासाठी जी रक्कम मोजावी लागते त्यापेक्षा अधिक रक्कम येथे कंडोमसाठी मोजावी लागते.

Condom Price in Venezuela: Condoms are more expensive than gold in this country, the price of a packet is as high as Rs 60,000 | या देशात सोन्यापेक्षाही महाग आहे कंडोम, एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजार रुपये 

या देशात सोन्यापेक्षाही महाग आहे कंडोम, एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजार रुपये 

googlenewsNext

काराकस (व्हेनेझुएला) - अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ठराविक किंमतीमध्ये कंडोम उपलब्ध होतो. मात्र असाही एक देश आहे जिथे गर्भधारणा टाळण्यासाठी वापरला जाणारा कंडोम हा प्रचंड महाग आहे. येथे कंडोमच्या एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजारापर्यंत आहे. म्हणजेच भारतात एक तोळा सोन्यासाठी जी रक्कम मोजावी लागते त्यापेक्षा अधिक रक्कम येथे कंडोमसाठी मोजावी लागते.

या देशाचं नाव आहे व्हेनेझुएला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या देशामध्ये कंट्रासेप्टव पिल्सची मागणी ही इतर गर्भनिरोधक प्रॉडक्टच्या तुलनेत खूप महाग आहे. या देशात एक पॅकेट कंडोमची किंमत ही तब्बल ६० हजार हजार रुपये एवढी आहे. त्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची किंमत सुमारे ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच इतर प्रॉडक्टची किंमतही अधिक आहे. अनेक वस्तू ब्लॅक मार्केटमध्ये मिळत असल्याने त्यांच्या किमतीही चढ्याच असतात.

दक्षिण अमेरिका खंडातील देश असलेल्या व्हेनेझुएलामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गर्भपात करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये आणि गर्भपात करावा लागू नये, म्हणून लोक खबरदारी घेत असतात. तसेच काळजी घेऊन संबंध ठेवतात. त्यामुळे येथे गर्भधारणा टाळण्यासाठीची औषधे महागड्या किमतीने विकली जातात.  
 

Web Title: Condom Price in Venezuela: Condoms are more expensive than gold in this country, the price of a packet is as high as Rs 60,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.