CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:15 PM2020-08-26T14:15:04+5:302020-08-26T16:28:05+5:30

CoronaVirus vaccine: जगभरात कोरोनाच्या 17 लसी आघाडीवर आहेत. या लसींची चाचणी घेतली जात आहे. ही लसही त्यातील एक आहे. कोरोना लसीवरील प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या स्टेजचे परिणाम जाहीर केले आहेत.

Confronted China! Australia made corona vaccine; first trial succesful | CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

Next

कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर चीनला भिडणाऱ्या छोट्याशा ऑस्ट्रेलियाने देखील लस तयार केली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाची लशीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली असून याचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. ऑस्ट्रेलिया केवळ 2.5 कोटी लोकसंख्येचा देश आहे. 


गेल्या महिन्यात क्विन्सलँड विद्यापीठ आणि बायोटेक कंपनी CSL ने ब्रिस्बेनमध्ये 120 व्हॉलेंटिअरना कोरोना लस टोचली होती. या मोहिमेवर काम करणारे सहाय्यक प्राध्यापक कीथ चॅपेल यांनी सांगितले की, युरोपमध्ये Viroclinics-DDL कडून या लसीची प्राण्यांवरही चाचणी करण्यात आली. यामध्ये देखील कोणतेही साईड इफेक्ट दिसलेले नसून ही चाचणी यशस्वी झाली आहे. संशोधकांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या या चाचणीमध्ये माणसांवर कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. 


जगभरात कोरोनाच्या 17 लसीं आघाडीवर आहेत. या लसींची चाचणी घेतली जात आहे. ऑस्ट्रेलियात घेतली गेलेली चाचणी या लसींपैकीच एका लसीची होती. जगभरात 130 लसींवर संशोधन केले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड विद्यापीठाने त्यांच्या कोरोना लसीवरील प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या स्टेजचे परिणार जाहीर केले आहेत. यामध्ये ही लस यशस्वी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिटनची कंपनी अॅस्ट्राझिनेकासोबत ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या खरेदीसाठी करार केला होता. जर ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या टप्प्यात लस मिळू शकते. 


थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता
काही तज्ज्ञ हिवाळ्यापर्यंत कोरोनाची लस येण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही तज्ज्ञ कोरोना पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त खतरनाक पद्धतीने पसरणार असल्याचे सांगत आहेत. थंडीमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही जास्त खतरनाक असू शकते, असे या तज्ज्ञांचे मत आहे. 
WHO सोबत काम केलेल्या इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट क्लाउज स्टोहर यांचा एक लेख 'द प्रिंट'मध्ये छापून आला आहे. या अहवालानुसार कोरोना व्हायरसचे एपिडेमायोलॉजिकल बिहेविअर कोणत्याही अन्य रेस्पिरेटरी डिसीजपासून वेगळे नसते. यामुळे आता सुस्त झालेला व्हायरस थंडीत पुन्हा सक्रीय होऊ शकतो. जगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून लढण्यासाठी तयार रहायला हवे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या लाटेपेक्षाही जास्त धोक्याची असू शकते. ब्रिटेनच्या अकादमी ऑण मेडिकल सायन्सचे देखील असेच मत आहे. येथील तज्ज्ञांनुसार 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये 2020 च्या सुरुवातीला जे हाल होते तसेच असणार आहेत. 

कोरोना लसीच्या भरवशावर राहणे चुकीचे
ब्रिटेनचे मुख्य मेडिकल ऑफिसर क्रिस व्हिट्टी यांनी सांगितले की, कोरोना लसीच्या भरवशावर राहणे चुकीचे आहे. न्यू स्कायला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्याला पुढील हिवाळ्यापर्यंत लसीशिवाय लढण्य़ासाठी तयार रहायला हवे. हिवाळ्यात लस मिळेल असा विचार करणे मुर्खपणाचे होईल. कदाचित माझे म्हणणे चुकीचेही ठरेल. कारण जगभरात कोरोना लसीवर काम सुरु आहे. लवकरात लवकर कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, ही लस सुरक्षित आहे का याचेही संशोधन होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला वेळ लागतो. यामुळे हिवाळ्यात आपल्याला लस मिळणार नाहीय या तयारीनेच कोरोनासोबत लढायला हवे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन

किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'

CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता

कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा

Web Title: Confronted China! Australia made corona vaccine; first trial succesful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.