ओबामांकडून भारतीयांचे अभिनंदन

By admin | Published: May 14, 2014 04:06 AM2014-05-14T04:06:10+5:302014-05-14T04:06:10+5:30

आगामी काळात उभय देशांचा समान कायापालट घडवून आणण्याच्या उद्देशाने आपण भारतातील नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

Congratulations to Obama from Obama | ओबामांकडून भारतीयांचे अभिनंदन

ओबामांकडून भारतीयांचे अभिनंदन

Next

वॉशिंग्टन : आगामी काळात उभय देशांचा समान कायापालट घडवून आणण्याच्या उद्देशाने आपण भारतातील नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल भारतीयांचे अभिनंदन करताना ओबामा म्हणाले की, भारताने जगाच्या इतिहासात सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक घेण्याचा आदर्श रचला आहे. ते विविधता आणि स्वातंत्र्यता या आपल्या मूल्याचे प्रतीक आहेत, असे ओबामांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेबाबत तसेच भारताच्या नव्या प्रशासनासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. ओबामा म्हणाले की, मागील दोन दशकांदरम्यान घनिष्ठ मित्रत्व आणि व्यापक भागिदारी विकसीत झाल्याने आमचे नागरिक अधिक सुरक्षित आणि समृद्ध झाले आहेत. महत्वपूर्ण भागीदारी पुढे नेण्यासह महत्वाकांक्षी अजेंडा तयार करण्यासाठी निवडून आलेल्या नेत्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Congratulations to Obama from Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.