'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार

By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 08:11 AM2021-01-23T08:11:01+5:302021-01-23T08:12:43+5:30

इतर देशांची मदत करून भारत खरा मित्र सिद्ध झाला, अमेरिकेकडूनही भारताचं कौतुक

Consignment of India made vaccines arrives in Brazil President Bolsonaro thanks PM Modi for sanjeevni booti | 'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार

'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्देभारतानं ब्राझीललाही केला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठाअमेरिकेनंही केलं भारताचं कौतुक

काही दिवसांपूर्वी भारतानं सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या वापरासाठी परवानगी दिली. त्यांतर देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. असं असलं तर भारत अन्य देशांच्या मदतीसाठीही धावून गेला आहे. शुक्रवारपासून भारतां अन्य देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यास सुरूवात केली. भारतानं ब्राझीलसाठीही लसी पाठवल्या आहेत. यानंतर ब्राझीलचेराष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी हनुमानाचं संजीवनी बुटी घेऊन जातानाचं छायाचित्र शेअर करत भारताचे आभार मानले आहेत. 

कोरोना प्रतिबंधात्मक लसींची खेप ब्राझीलला पोहोचल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं ब्राझीलला तब्बल २० लाख डोस पाठवले आहेत. बोलसोनारो यांनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचं छायाचित्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. "जागतिक समस्येला दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये सामील एक मोठा सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. ब्राझीलला कोरोना प्रतिबंधात्मक लसींची निर्यात करण्यसाठी धन्यवाद," असं ट्वीट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी केलं आहे. तसंच त्यांनी हिंदीमध्येदेखील धन्यवाद लिहीत भारताचे आभार मानले आहेत.



दुसऱ्या देशांना लसीचा पुरवठा करत असल्याबाबत अमेरिकेनंही भारताचं कौतुक केलं आहे. "जागतिक आरोग्य सेवेमध्ये भारत साकारत असेलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत. भारतानं दक्षिण आशियामध्ये कोरोना लसीची खेप पाठवली आहे. भारताकडून मालदीव, भूतान, बांगलादेश आणि नेपाळला मोफत लस पाठवण्याची सुरू झालेली मोहीम दुसऱ्यांपर्यंत नक्की पोहोचेल. जागतिक समुदायाच्या मदतीसाठी आपल्या औषधांचा उपयोग करत भारत एक खरा मित्र सिद्ध झाला आहे," असं म्हणत अमेरिकेनंही भारताचं कौतुक केलं आहे.
 


समोर आलेल्या माहितीनुसार भारत ब्राझील आणि मोरक्कोला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे २०-२० लाख डोस कमर्शिअल सप्लाय अंतर्गत पाठवत आहे. म्यानमारलाही १५ लाख डोस पाठवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सेशल्सला ५० हजार आणि मॉरिशसला १ लाख डोस पाठवले जाणार आहेत.

Web Title: Consignment of India made vaccines arrives in Brazil President Bolsonaro thanks PM Modi for sanjeevni booti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.