हेडफोन, इअरबड्सचा सतत वापर तुम्हाला बहिरे करणार! जगभरातील एक अब्जाहून अधिक मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:25 AM2022-11-17T06:25:58+5:302022-11-17T06:26:27+5:30

कानाला सतत लावलेले इअरबड्स किंवा हेडफोन, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, खूप गोंगाट असलेल्या संगीत कार्यक्रमांना aहजेरी लावणे या गोष्टींमुळे जगभरातील एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुले व युवकांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका  आहे

Constant use of headphones, earbuds will make you deaf! More than a billion children worldwide are at risk of hearing loss | हेडफोन, इअरबड्सचा सतत वापर तुम्हाला बहिरे करणार! जगभरातील एक अब्जाहून अधिक मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होण्याचा धोका

हेडफोन, इअरबड्सचा सतत वापर तुम्हाला बहिरे करणार! जगभरातील एक अब्जाहून अधिक मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होण्याचा धोका

googlenewsNext

वॉशिंग्टन : कानाला सतत लावलेले इअरबड्स किंवा हेडफोन, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, खूप गोंगाट असलेल्या संगीत कार्यक्रमांना aहजेरी लावणे या गोष्टींमुळे जगभरातील एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुले व युवकांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका  आहे असे एका पाहणी अहवालात म्हटले आहे. बीएमआय ग्लोबल हेल्थ या नियतकालिकात या अहवालावर आधारित लेख प्रसिद्ध झाला आहे. ही आरोग्यविषयक गंभीर समस्या असून, तिच्या नियंत्रणासाठी  ठोस धोरणे आखण्याची गरज आहे.

आनंद मिळेल, मात्र...
nबीएमआय ग्लोबल हेल्थ या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये १२ ते ३४ वर्षे वयोगटातील मुले, युवकांचा समावेश होता.
nगाणी किंवा कार्यक्रम ऐकल्याने मनाला आनंद मिळतो. मात्र, मोठ्या आवाजात सतत गोष्टी ऐकत राहिले तर त्याचा श्रवणशक्तीवर परिणाम होतो. 
nत्यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो. पण, या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, हे चुकीचे असल्याचे या पाहणीच्या अहवालात म्हटले आहे. 

आरोग्य संघटनेने म्हटले आहे की,  युवावर्ग स्मार्टफोन, हेडफोन, इअरबड्स अशा गोष्टींचा सातत्याने वापर करतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. या गोष्टींमुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
हेडफोन, इअरबड्स वापरणारे ध्वनीची पातळी १०५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवून कार्यक्रम, गाणी ऐकतात. 
संगीत कार्यक्रमात ध्वनीची पातळी १०४ ते ११२ डेसिबलच्या दरम्यान असते. प्रौढ व्यक्तींनी ८० डेसिबल व लहान मुलांनी ७५ डेसिबल इतकी ध्वनीची पातळी राखून कार्यक्रम काही काळच ऐकले पाहिजेत. 
 

Web Title: Constant use of headphones, earbuds will make you deaf! More than a billion children worldwide are at risk of hearing loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.