शी जिनपिंगसाठी घटनादुरुस्तीचा घाट, कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:46 PM2018-02-25T23:46:45+5:302018-02-25T23:46:45+5:30
चीनचे विद्यमान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्या पदावर बेमुदत राहता यावे यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीने केला आहे.
बीजिंग : चीनचे विद्यमान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्या पदावर बेमुदत राहता यावे यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट
पक्षाने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीने केला आहे.
चीनच्या राज्यघटनेनुसार कोणालाही राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदावर प्रत्येकी पाच वर्षांच्या दोन लागोपाठच्या कालखंडांखेरीज जास्त काळ राहता येत नाही. शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाचा पाच वर्षांचा पहिला कालखंड संपत आला आहे. येत्या ५ मार्चपासून सुरु होणाºया चीनच्या संसद अधिवेशनात शी यांची पुन्हा पाच वर्षांसाठी राष्ट्राध्यक्षपदी निवड होणे नक्की आहे. चीनची संसद ‘रबर स्टँप’सारखी असून तिच्यात शी समर्थकांचे भारी बहुमत आहे.
शीन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रस्तावित घटनादुरुस्तीविषयी त्रोटक घोषणा केली. त्यानुसार राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षपदांसाठी सध्या असलेली लागोपाठ दोन कालखंडांची कमाल मर्यादा दूर करण्याचा प्रस्ताव कम्युन्स्टि पक्षाच्या केंद्रीय समितीने केली आहे. शी पक्षप्रमुखही आहेत आणि संसदेतही त्यांच्या समर्थकांचे प्राबल्य आहे, हे पाहता शी यांना पाच वर्षांच्या दुसºया कालखंडानंतरही राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याचा मार्ग सुकर असल्याचे मानले जाते.