ब्रिटिश सरकारशी नेताजींच्या दस्तावेजांसाठी संपर्क
By admin | Published: August 30, 2015 10:23 PM2015-08-30T22:23:04+5:302015-08-30T22:23:04+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित काही दस्तावेजांसाठी इंग्लंडकडे बोस यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधला आहे. बोस यांच्या पुतण्याचा भाचा सूर्यकुमार बोस
बर्लिन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित काही दस्तावेजांसाठी इंग्लंडकडे बोस यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधला आहे. बोस यांच्या पुतण्याचा भाचा सूर्यकुमार बोस यांनी ही माहिती दिली. जपान आणि रशिया यांच्याकडे जशी काही कागदपत्रे वा दस्तावेज आहेत, तसेच ते ब्रिटिश सरकारकडेही असल्याचे बोस यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. सूर्यकुमार बोस यांची बहीण लंडनमध्ये राहत असून, ब्रिटिश सरकारने आमच्याकडे काही दस्तावेज असल्याचे मान्य केल्याचे ती म्हणाली.
सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित दस्तावेज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सूर्यकुमार बोस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडेही एप्रिलमध्ये केली असून, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही. ही कागदपत्रे खुली करण्याची धमक मोदी यांच्याकडे असून, जे काही समोर येईल त्याला तोंड देण्याची आमची तयारी आहे, असे ते म्हणाले.