कॅनडात शीख संरक्षण मंत्र्याविरुद्ध वंशभेदी टिपणी
By admin | Published: November 14, 2015 01:22 AM2015-11-14T01:22:42+5:302015-11-14T01:22:42+5:30
कॅनडाचे नवनियुक्त शीख संरक्षणमंत्री हरजित सज्जन यांच्याविरुद्ध एका सैनिकाने सोशल मीडियावर कथितरीत्या वंशभेदी टिपणी केली असून कॅनडातील लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Next
टोरँटो : कॅनडाचे नवनियुक्त शीख संरक्षणमंत्री हरजित सज्जन यांच्याविरुद्ध एका सैनिकाने सोशल मीडियावर कथितरीत्या वंशभेदी टिपणी केली असून कॅनडातील लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
‘द ग्लोब अँड मेल’ या दैनिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा वंशभेदी टिपणी करणारा सैनिक कोण आहे? हे जाहीर करण्यास मनाई करण्यात आलेली असली तरीही क्युबेकच्या एका गैरकमिशन प्राप्त सदस्याने भारतात जन्मलेल्या हरजित सज्जन यांच्या जातीय पृष्ठभूमीबाबत अनुचित वक्तव्य दिले आहे. युवक असताना सज्जन यांनी भारतातून कॅनडात स्थलांतर केले होते