कराचीत विमानतळावर पुन्हा गोळीबार सुरू
By admin | Published: June 9, 2014 06:07 AM2014-06-09T06:07:47+5:302014-06-09T10:53:14+5:30
पाकिस्तानमधील कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशवाद्यांचे तांडव पुन्हा एकदा सुरू झाले असून पुन्हा एकदा गोळीबाराला सुरूवात झाली आहे.
Next
>
ऑनलाइन टीम
कराची, दि.९ - पाकिस्तानमधील कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशवाद्यांचे तांडव पुन्हा एकदा सुरू झाले असून पुन्हा एकदा गोळीबाराला सुरूवात झाली आहे. जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-१ वर पुन्हा गोळीबार सुरू झाल्याचे वृत्त असून तेथे आणखी तीन दहतशवादी लपल्याचे समजते.
रविवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी विमानतळावर केलेल्या हल्ल्यात दहा दहशतवाद्यांसह २३ जण ठार झाले. रात्रभर चाललेल्या या हल्यानंतर लष्कराने दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र सोमवारी सकाळी गोळीबाराल पुन्हा सुरूवात झाली आहे. दरम्यान, तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची स्वीकारली आहे.
सरकारी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विमानतळात घुसून हल्ला केला. हजला जाणारे यात्रेकरू आणि व्हीव्हीआयपी या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. तसेच विमान अपहरण करण्याचाही त्यांचा मनसुबा होता असे समजते. दहशतवाद्यांनी प्रथम हॅन्डग्रेनेड फेकण्यास सुरूवात केली व अंदाधुंद गोळीबारही केला. रात्रभर चाललेल्या या धुमश्चक्रीत लष्कराने दहाही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. या हल्ल्यात सुमारे १८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लष्कराने विमानतळावर ताबा मिळवला असून घटनास्थळाहून रॉकेट लाँचर, हॅन्ड ग्रेनेड, बंदुका व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान या हल्ल्यात विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण विमानतळ रिकामे करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.हॅन्डग्रेनेड हल्ल्यामुळे विमानतळावर मोठी आग भडकून त्यात विमानतळावरील अनेक विमानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान 'जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा नेता हफिझ सईदने या हल्ल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवले आहे. मोदींची नवी सरक्षा टीम या हल्ल्यासाठी जबाबादार असून खरा शत्रू कोण आहे , हे देशाला माहीत आहे, असे ट्विट त्याने केले आहे.