‘गर्भनिरोधक गोळी प्रिस्क्रिप्शनशिवाय द्या’ ;अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:07 PM2023-05-12T12:07:54+5:302023-05-12T12:09:10+5:30

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कंपनीने २००५ मध्ये व्यावसायिक कारणास्तव गोळीची विक्री थांबवली.

"Contraceptive Pills Without a Prescription"; US Food and Drug Administration Advisory | ‘गर्भनिरोधक गोळी प्रिस्क्रिप्शनशिवाय द्या’ ;अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाला सल्ला

‘गर्भनिरोधक गोळी प्रिस्क्रिप्शनशिवाय द्या’ ;अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाला सल्ला

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाला सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांच्या एका समितीने बुधवारी प्रथमच एकमताने शिफारस केली की, महिलांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) गर्भनिरोधक गोळी घेण्याची परवानगी द्यावी.

पॅनेलला विचारण्यात आले होते की, एचआरए फार्माची गर्भनिरोधक गोळी ओपिल विकण्याचे फायदे ग्राहकांच्या औषधांचा अयोग्य वापर करून अनपेक्षित गर्भधारणा होण्याच्या जोखमीपेक्षा जास्त आहेत का? एफडीए त्याच्या स्वतंत्र सल्लागारांच्या शिफारशींचे पालन करण्यास बांधील नाही, त्यापैकी सर्व १७ जणांनी दोन दिवसांच्या सुनावणीनंतर प्रस्तावावर ‘होय’ असे मत दिले. परंतु, एचआरए फार्मा या उन्हाळ्यात विना प्रिस्क्रिप्शन विक्रीसाठीच्या अर्जावर अंतिम निर्णयाची अपेक्षा करते. 

'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

नेमके काय होईल?

अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्रिप्शन असलेल्या स्त्रियांनाच उपलब्ध आहेत. एफडीएने एचआरए फार्माच्या अर्जाला मान्यता दिल्यास, स्त्रिया प्रथम डॉक्टर किंवा इतर आरोग्य सेवा प्रदात्याला भेट न देता ओपिल मिळवू शकतात. एफडीएने मूळतः १९७३मध्ये नॉरजेस्ट्रेलला प्रिस्क्रिप्शन औषध म्हणून मान्यता दिली होती, परंतु एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कंपनीने २००५ मध्ये व्यावसायिक कारणास्तव गोळीची विक्री थांबवली.

Web Title: "Contraceptive Pills Without a Prescription"; US Food and Drug Administration Advisory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.