युक्रेनचा युरोपियन युनियनशी करार

By admin | Published: June 28, 2014 01:27 AM2014-06-28T01:27:29+5:302014-06-28T01:27:29+5:30

युक्रेनचे नवे नेते पेट्रो पोरोशेंको यांनी युरोपियन युनियनशी महत्त्वाचा आर्थिक व राजकीय करार केला असून, रशियाने त्या विरोधात लगेचच कडवी प्रतिक्रिया दिली आहे.

Contract with the European Union of Ukraine | युक्रेनचा युरोपियन युनियनशी करार

युक्रेनचा युरोपियन युनियनशी करार

Next
>ब्रुसेल्स : युक्रेनचे नवे नेते पेट्रो पोरोशेंको यांनी युरोपियन युनियनशी महत्त्वाचा आर्थिक व राजकीय करार केला असून, रशियाने त्या विरोधात लगेचच कडवी प्रतिक्रिया दिली आहे. 
युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी युरोपियन युनियनशी 12क्क् पानी करारपत्रवर स्वाक्षरी केली असून, त्यानुसार युक्रेन व युरोपियन युनियन यांच्यातील राजकीय व व्यापारी संबंध ठरणार आहेत. यामुळे युक्रेन रशियाच्या ताब्यातून सुटणार आहे. युरोप व रशिया यांच्यात भौगोलिक केंद्रस्थानी असणारा व राजकीय संघर्षबिंदू ठरलेल्या या देशासाठी हा टर्निग पॉईंट ठरणार आहे. 
रशियाच्या नेतृत्वाखालील आघाडीत युक्रेनचा समावेश करण्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे स्वप्न भंगले आहे. युक्रेनविरोधात तात्काळ उपाय योजले जातील, असे पुतीन यांनी जाहीर केले आहे. युक्रेनच्या पूर्व भागाला हा करार मान्य होणो कठीण आहे. युक्रेनच्या नव्या नेत्यावर त्यांचा अविश्वास असून, या भागात अजूनही हिंसाचार उफाळलेला आहे. बंडखोरांच्या हल्ल्यात पाच सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे. बंडखोरांनी संघटनेचे चार निरीक्षक सोडून दिले आहेत, त्यानंतर काही तासात हा करार झाला. रशियाच्या नेतृत्वाखाली पूर्व युक्रेनमध्ये हिंसाचार चालू आहे; पण रशियाचे अध्यक्ष हे मानण्यास तयार नाहीत. पोरोशेंको यांनी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर युक्रेनवर आर्थिक र्निबध लादण्याची घोषणा रशियाने केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Contract with the European Union of Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.