पूर्व युक्रेनचा ताबा रशियाकडेच जाणार
By admin | Published: May 7, 2014 06:20 AM2014-05-07T06:20:09+5:302014-05-07T06:23:12+5:30
रशियाचे सैन्य पूर्व युक्रेनमध्ये नसले तरीही रशिया समर्थक बंडखोर ती कामगिरी पार पाडण्यास सक्षम असून, सैन्य न पाठवताही पूर्व युक्रेन रशियाच्या ताब्यात जाऊ शकतो, असे अमेरिकेच्या अधिका-यांनी म्हटले आहे.
Next
>ओटावा- पूर्व युक्रेनमध्ये आपले सैन्य नसल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष पुतीन करत आहेत; पण रशियाचे सैन्य पूर्व युक्रेनमध्ये नसले तरीही रशिया समर्थक बंडखोर ती कामगिरी पार पाडण्यास सक्षम असून, सैन्य न पाठवताही पूर्व युक्रेन रशियाच्या ताब्यात जाऊ शकतो, असे अमेरिकन हवाई दलाचे जनरल फिलिप ब्रीडलोव्ह यांनी म्हटले आहे. पूर्व युक्रेनमध्ये तेथील नागरिकच सरकारविरोधात लढत असल्याचा रशियाचा दावा खोटा असून, रशियन समर्थक बंडखोर हे रशियाचेच विशेष सैनिक असल्याचे ब्रीडलोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाने ज्या पद्धतीने क्रिमिया ताब्यात घेतला, तसाच आता पूर्व युक्रेनही रशिया गिळंकृत करेल असे त्यानी सांगितले. दरम्यान युक्रेनमध्ये चाललेल्या धुमश्चक्रीत मरण पावलेल्या लोकांचा आकडा आता ३४ झाला आहे.