हॅकर्सनी घेतला चालत्या कारचा इंटरनेटद्वारे कंट्रोल
By admin | Published: July 22, 2015 11:58 PM2015-07-22T23:58:46+5:302015-07-22T23:58:46+5:30
दोन संशोधकांनी इंटरनेटवरून रस्त्यावर चाललेल्या कारचा कंट्रोल घेतला असून, चालती कार बंद पाडणे, तिचा वेग वाढविणे या गोष्टी इंटरनेटच्या
सॅन फ्रान्सिस्को : दोन संशोधकांनी इंटरनेटवरून रस्त्यावर चाललेल्या कारचा कंट्रोल घेतला असून, चालती कार बंद पाडणे, तिचा वेग वाढविणे या गोष्टी इंटरनेटच्या साहाय्याने करून दाखविल्या आहेत. या प्रयोगामुळे रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची सुरक्षा काय? असा प्रश्न निर्माण झाला असून, अमेरिकेत त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
माजी राष्ट्रीय सुरक्षा संघटनेतील हॅकर चार्ली मिलर व आयओ संशोधक ख्रिस वालासेक यांनी पत्रकाराच्या कारवर हा प्रयोग केला. त्यांनी चेरोके जीपमधील रेडिओ सुरू केला. त्यानंतर स्वारी स्टिअरिंग, ब्रेक व इंजिनाकडे वळली आणि इंटरनेटवरून याही यंत्रणा चालविता येतात काय याची चाचणी घेण्यात आली. रस्त्यावर धावणाऱ्या हजारो कार अशा नियंत्रणात घेणे शक्य आहे, असे मिलर यांनी सांगितले.