अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी रस्सीखेच, नाराज डोनाल्ड ट्रम्प यांचं कमला हॅरिस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 17:45 IST2024-07-28T17:44:41+5:302024-07-28T17:45:14+5:30
कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले.

अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी रस्सीखेच, नाराज डोनाल्ड ट्रम्प यांचं कमला हॅरिस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान
या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीतील मुख्य लढत देशाच्या विद्यमान उपराष्ट्रपती डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन उेदवार माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आहे. महत्वचे म्हणजे, निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे दोन्ही नेत्यांमधील शब्दद्वंद्व अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.
कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले.
ट्रंप आणि व्हॅन्स यांच्याकडून येणारी अधिकांश विधाने विचित्र -
मॅसॅच्युसेट्समध्ये बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी सिनेटर जेडी व्हॅन्स यांच्याकडून येणारी बहुतेक विधानं विचित्र आहेत. याचबरोबर, कमला हॅरिस त्यांच्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांना म्हातारे आणि विचित्र म्हणूनही संबोधत आहेत. हॅरिस ट्रम्प यांना वारंवार 'विचित्र' म्हणत आहेत कारण हा शब्द तिच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणाचा भाग आहे.
कमला हॅरिस अमेरिकेला बर्बाद करतील -
कमला हॅरिस यांना प्रत्युत्तर देतान ट्रम्प म्हणाले, हॅरिस देशाला बर्बाद करतील. सार्वजनिक सुरक्षेपासून ते इमिग्रेशनपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवरून ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर टीका केली. कमला हॅरिससारख्या वेड्या उदारमतवादी सत्तेवर आल्यास अमेरिकेच्या स्वप्नांनाच चुराडा होईल. तसेच त्या बायडेन यांचेपेक्षाही वाईट असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.