CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटच्या नावावरून वाद; Xi देणे डब्ल्यूएचओने मुद्दाम टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 04:00 PM2021-11-27T16:00:03+5:302021-11-27T16:09:46+5:30
New Corona Variant: WHO नेच कोरोना मे महिन्याच्या सुरुवातीला व्हेरिअंटसची नावे ही कोणत्याही देशाच्या नाही तर ग्रीक अल्फाबेट्सच्या हिशेबाने ठेवण्यात येतील असे म्हटले होते.
ज्या चीनमुळे कोरोनाचे संकट जगावर कोसळले, लाखो लोकांचा मृत्यू झाला त्या चीनला पुन्हा बदनामीपासून वाचविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) पुन्हा एकदा सरसावली आहे. ताजी घटना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवरून आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटला जे नाव देण्यात आले आहे, त्यावरून नवा वाद सुरु झाला आहे.
WHO नेच कोरोना मे महिन्याच्या सुरुवातीला व्हेरिअंटसची नावे ही कोणत्याही देशाच्या नाही तर ग्रीक अल्फाबेट्सच्या हिशेबाने ठेवण्यात येतील असे म्हटले होते. यामुळे आजवर जेवढे नवे व्हेरिअंट सापडले त्यांची नावे ग्रीक अक्षरांनुसार ठेवण्यात आली होती. मात्र, आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटचे नाव ठेवताना WHO ने चीनला पुन्हा वाचविण्याचे काम केले आहे.
डब्ल्यूएचओने B.1.1.529 या व्हेरिअंटचे नाव Omicron ठेवले आहे. परंतू अल्फाबेट क्रमानुसार नव्या व्हेरिअंटचे नाव Nu किंवा Xi असणे अपेक्षित होते. कारण त्याच्या मागच्या व्हेरिअंटचे नाव Mu होते. डब्ल्यूएचओने वाद ओढवल्यावर सफाई देताना म्हटले की, कोणत्याही क्षेत्रावर बदनामीचा डाग येऊ नये म्हणून Nu किंवा Xi ही नावे देण्यात आली नाहीत.
द टेलिग्राफच्या संपादकांनी एक ट्विट करून म्हटले की, ही दोन नावे मुद्दामहून वगळण्यात आली आहेत. Nu हे नाव अशासाठी घेतले नाही, कारण न्यू (NEW) मुळे कन्फ्युजन होऊ नये. तर Xi हे नाव एका नेत्याचे असल्याने त्या क्षेत्रावर डाग लागू नये म्हणून वगळण्यात आले.
News of new Nu variant, but WHO is jumping the alphabet to call it Omicron, so they can avoid Xi. pic.twitter.com/UJ4xMwg52i
— Martin Kulldorff (@MartinKulldorff) November 26, 2021
अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी WHO चा निषेध केला आहे. ते म्हणाले, 'जर WHO चिनी कम्युनिस्ट पक्षाला एवढी घाबरत असेल तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवता येईल. ते विनाशकारी जागतिक महामारी झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काय आहे नाव ठेवण्याची पद्धत
या वर्षी 31 मे रोजी, WHO ने कोरोना व्हायरसच्या प्रकारांची नावे देण्याचा 'सोपा मार्ग' पुढे केला. ग्रीक अक्षरे अनुक्रमाने प्रत्येक प्रकाराला नियुक्त केली होती. कोविड प्रकारांना आतापर्यंत 'अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, एप्सिलॉन, झिटा, इटा, थिटा, ओटा, कप्पा, लॅम्बडा, मु' असे नाव देण्यात आले होते.
संबंधित बातम्या...