20 हजार डॉलर्समध्ये विकली गेली हिटलरकडील ' माईन काम्फ'ची कॉपी
By admin | Published: March 21, 2016 10:08 AM2016-03-21T10:08:54+5:302016-03-21T11:03:17+5:30
जर्मनीतील हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या ' माईन काम्फ' या आत्मचरित्राच्या पर्सनल कॉपीचा लिलाव करण्यात आला असता तब्बल २० हजार डॉलर्सना ते विकत घेण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. २१ - जर्मनीतील हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या ' माईन काम्फ' या आत्मचरित्राच्या पर्सनल कॉपीचा लिलाव करण्यात आला असता ते तब्बल २० हजार डॉलर्सना (13 लाख 73 हजार रुपये) विकले गेले. हिटरलने कारागृहात असताना हे पुस्तक लिहिलं होतं. अलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शनमध्ये या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला. महत्वाचं म्हणजे हिटलरने स्वत: या पुस्तकाची खरेदी केली होती.
'माईन काम्फ' हे पुस्तक पहिल्यांदा 1924 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. या पुस्तकात हिटलरने आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दलं तसेच जनेतबद्दल असणारा द्वेष तसंच त्यांना नष्ट करण्यासाठी आपण रचलेली रणनीती याबद्द्ल सविस्तरपणे लिहिले होते.
काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला असता तब्बल 20 हजार डॉलर्स देऊन अमेरिकेतील एका व्यक्तीने हे पुस्तक विकत घेतले. दरम्यान प्रत्यक्ष सहभागींशिवाय ऑनलाईन वा फोनच्या माध्यमातूनही काही लोक या लिलावात सहभागी झाले होेते.
अमेरिकी सैन्याला दुस-या महायुद्धाच्या शेवटी 2 मार्च 1945 रोजी हे पुस्तक अॅडॉल्फ हिटलरच्या अपार्टमेंटमध्ये सापडलं होतं. त्या पुस्तका;च्या पहिल्या पानावर " 2 मार्च 1945 रोजी अॅडॉल्फ हिटलरच्या अपार्टमेंटमधून" असं लिहून 11 अधिका-यांनी सही केली होती.