माकडाच्या सेल्फीवरुन कॉपीराईटचा वाद

By admin | Published: August 7, 2014 05:54 PM2014-08-07T17:54:20+5:302014-08-07T17:54:20+5:30

इंडोनेशियातील एका माकडाने सेल्फी काढली असून माकडाच्या सेल्फीच्या कॉपीराईटवरुन आता वाद निर्माण झाला आहे.

Copyright Claim from Monkey Selfie | माकडाच्या सेल्फीवरुन कॉपीराईटचा वाद

माकडाच्या सेल्फीवरुन कॉपीराईटचा वाद

Next

ऑनलाइन टीम
न्यूयॉर्क, दि. ७ - इंडोनेशियातील एका माकडाने सेल्फी काढली असून माकडाच्या सेल्फीच्या कॉपीराईटवरुन आता वाद निर्माण झाला आहे. सेल्फी माकडाने काढल्याने फोटोचे कॉपीराईट माकडालाच दिले जातील असे विकिपीडियाचे म्हणणे असून माकडाच्या हाती माझा कॅमेरा असल्याने या फोटोचे कॉपीराईटही माझ्याकडेच असायला पाहिजे असा दावा संबंधित छायाचित्रकाराने केला आहे. त्यामुळे एका छायाचित्रकाराने या सेल्फीवरुन विकिपीडियाविरोधात ३० हजार डॉलर्स दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
छायाचित्रकार डेव्हीड स्लॅटर हे तीन वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुलावेसी येथे फिरायला गेले होते. तिथे मकॅक्यू जातीच्या एका माकडाने स्लॅटर यांच्याकडून कॅमेरा हिसकावला व तिथून धूम ठोकली. सध्या प्रत्येकाला सेल्फीचे वेड लागले असून मोबाईलवर सेल्फी काढून ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकण्याचा ट्रेंड सगळीकडेच दिसून येतो. या माकडालाही कॅमेरा हातात आल्यावर सेल्फीचा मोह आवरता आला नाही आणि त्यानेदेखील सेल्फी काढली. त्या कॅमे-यात माकडाने स्वतःचे तब्बल १०० हून अधिक फोटो क्लिक केले. माकडाची ही सेल्फी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. विकीपिडीयानेही माकडाची सेल्फी अपलोड करुन त्या फोटोचे कॉपीराइट माकडाला दिले. मात्र विकिपीडियाच्या या निर्णयावर स्लॅटर यांनी नाराजी दर्शवली आहे. माकडा हा माणूस नसून तो एक प्राणी आहे. त्यामुळे त्याला कॉपीराईट देण्यात काहीच अर्थ नाही असे स्लॅटर यांचे म्हणणे आहे. विकिपीडियाने विनापरवानगी हा फोटो अपलोड केल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे स्लॅटर यांनी सांगितले. यासाठी विकिपीडियावर ३० हजार डॉलर्सचा दावा ठोकणार असल्याचे स्लॅटर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माकडाची ही सेल्फी आता चर्चेत आली असून कोर्टात विकिपीडियाच्याविरोधात निकाल गेल्यास त्यांना ही सेल्फी चांगलीच महागात पडेल ऐवढे मात्र नक्की.

 

Web Title: Copyright Claim from Monkey Selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.