अमेरिकेतही नागरिकांवर आली उपासमारीची वेळ,एकमेव महासत्ता असेलेली अमेरिका आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:36 PM2020-05-13T17:36:44+5:302020-05-13T17:37:24+5:30

कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलेले असूनही अजूनही हवेतसे कडक निर्बंध तिथे लावण्यात आलेले नाहीत.

Corona causes food crisis for 1.7 million people in the United States | अमेरिकेतही नागरिकांवर आली उपासमारीची वेळ,एकमेव महासत्ता असेलेली अमेरिका आर्थिक संकटात

अमेरिकेतही नागरिकांवर आली उपासमारीची वेळ,एकमेव महासत्ता असेलेली अमेरिका आर्थिक संकटात

Next

कोरोनाच्या  संकटामुळे जगातील बलाढ्य देशांना देखील हतबल करून सोडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगधंदे बंद झाल्याने पैसाही हातात नाही. अशात नेमके करायचे तरी काय असा प्रश्न सा-यांनाच भेडसावत आहे.  सध्या जगातली एकमेव महासत्ता असलेली अमेरिका आर्थिक संकटाचा समना करत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अमेरिका कोरोनामुळे जगभरात सर्वाधिक प्रभावित देश आहे. अमेरिकेत काेराेना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. १३ लाखांपेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. ८० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झालेत. कोरोनामुळे दोन महिन्यांत सुमारे १.७ कोटी लोकांसमोर खाद्यान्न संकट उभे ठाकले आहे. 

दोन महिन्यांत ही संख्या सुमारे ४६% वाढली आहे.कोरोनाचे वाढते रुग्ण बघता तेथील स्थिती आता नियंत्रणा बाहेर गेली आहे. यात बहुतांशी असे आहेत ज्यांनी आयुष्यात कधीच खाण्या-पिण्यासाठी मदत मागितलेली नाही. खाद्यपदार्थ सांभाळून ठेवण्याची ही वेळ आहे.गरजूंसाठी दोन लाख स्वयंसेवक मदत करत आहेत.तसेच कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला होता. आगामी काळ सर्वांसाठी उमेदीचा असेल. यंदा वर्षअखेरीस सर्वकाही ठीक होईल, अशी आशाही ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.

कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलेले असूनही अजूनही हवेतसे कडक निर्बंध तिथे लावण्यात आलेले नाहीत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा गाडा घसरू नये म्हणून लॉकडाऊन हवा तसा लावण्यात आलेला नाही. पहिल्यांदाच अमेरिका अशा महामारीमुळे इतकी हतबल झाली असावी.  

Web Title: Corona causes food crisis for 1.7 million people in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.