कोरोनाचे बळी १००० वर; ४२ हजार नागरिकांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:59 AM2020-02-12T04:59:24+5:302020-02-12T04:59:40+5:30
चीनमधील संसर्ग थांबता थांबेना : बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १००० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ...
चीनमधील संसर्ग थांबता थांबेना :
बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १००० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ४२ हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. सोमवारी कोरोनामुळे आणखी १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २४७८ नवी प्रकरणे समोर आली आहेत.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२,६३८ जणांना संसर्ग झाला आहे. सोमवारी ज्या १०८ लोकांचा मृत्यू झाला त्यातील १०३ जण हुबेई प्रांतातील होते. या विषाणुंमुळे सर्वाधिक बळी या प्रांतात गेले आहेत. याशिवाय बीजिंग, तिआंजिन, हीलोंगजियांग, अनहुइ आणि हेनानमध्ये यामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एकूण ३९९६ लोकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.
या विषाणुुंचा संसर्ग झालेल्या ७३३३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या विषाणुंचा संसर्ग २१,६७५ लोकांना झाल्याची शक्यता आहे. हाँगकाँगमध्ये सोमवारपर्यंत याचे ४२ रुग्ण समोर आले आहेत.
वैद्यकीय विद्यार्थिनीच्या चाचण्या नकारात्मक
थ्रिसूर (केरळ) : भारतातील पहिल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णाच्या चाचण्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) येथील स्थानिक केंद्रातील तपासणीत नकारात्मक आढळल्यामुळे केरळला मोठा दिलासा मिळाला आहे, असे आरोग्य अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
येथील या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्याची अधिकृत घोषणा मात्र अलाप्पुझा येथील केंद्राने जे निष्कर्ष काढले त्याला पुणे येथील एनआयव्हीमध्ये झालेल्या तिच्या रक्ताच्या चाचण्यांच्या निष्कर्षाला दुजोरा दिल्यानंतरच केली जाईल, असे हा अधिकारी म्हणाला.
भारतीय नागरिकाला दुबईत विषाणू बाधा
च्दुबई : संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय नागरिकाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे या विषाणूची बाधा झालेल्यांची एकूण संख्या आठ झाली आहे, असे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या विषाणूचे निदान झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात हा भारतीय नागरिक आला, असे अधिकारी म्हणाला.
कुठे किती रुग्ण?
या विषाणूने जगभरात ४३ हजार लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. यात जपान १६१, सिंगापूर ४५, थायलंड ३३, दक्षिण कोरिया २८, तैवान १६, मलेशिया १८, आॅस्ट्रेलिया १४, जर्मनी १४, व्हिएतनाम १५, अमेरिका १३, फ्रान्स ११, यूएई ८, कॅनडा ७, फिलिपिन्स ३ आणि भारतात ३ जणांना याचा संसर्ग झाला आहे. याशिवाय रशिया २, इटली ३, नेपाळ १, श्रीलंका १, स्वीडन १, स्पेन २ लोकांना संसर्ग झाला आहे.
आम्ही भारतीयांच्या संपर्कात
टोकियो : डायमंड प्रिन्सेस या जहाजावर कोरोना व्हायरसची बाधा काही जणांना झाल्याचे उघड झाल्यावर येथील भारतीय दुतावासाने मंगळवारी आम्ही या जहाजावरील १३८ भारतीयांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
या जहाजावर ३,७११ (प््रवासी व कर्मचारी) जण असून या जहाजाला वेगळे ठेवण्यात आले आहे.
च्गेल्या आठवड्यात हे जहाज जपानच्या किनाºयावर आल्यानंतर एका प्रवाशाला या विषाणूची बाधा झाल्याचे आढळले. हा प्रवासी गेल्या महिन्यात हाँगकाँगहून आला होता.