चीनमध्ये कडक निर्बंधादरम्यान कोरोनाचा स्फोट; शांघायमध्ये रुग्णांची विक्रमी वाढ, इतर शहरांमध्येही लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:17 PM2022-04-16T17:17:15+5:302022-04-16T17:17:55+5:30

China Corona : कोरोना महामारीच्या नियंत्रणामुळे सप्लाय चैनवर या नवीन निर्बंधांचा मोठा परिणाम होत आहे.

corona explosion amid tight restrictions in china lockdown imposed in many other cities | चीनमध्ये कडक निर्बंधादरम्यान कोरोनाचा स्फोट; शांघायमध्ये रुग्णांची विक्रमी वाढ, इतर शहरांमध्येही लॉकडाऊन

चीनमध्ये कडक निर्बंधादरम्यान कोरोनाचा स्फोट; शांघायमध्ये रुग्णांची विक्रमी वाढ, इतर शहरांमध्येही लॉकडाऊन

Next

शांघाय : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus Cases in China) कहर सुरूच आहे. देशाची आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाऊन (Lockdown in Shanghai) असूनही कोरोनाची विक्रमी प्रकरणे समोर येत आहेत. कोरोना महामारीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन सरकार शून्य कोविड पॉलिसीवर काम करत आहे, परंतु अजूनही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, झेंग्झू एअरपोर्ट इकॉनॉमिक झोनमध्ये अॅपल, फॉक्सकॉनसह अनेक कंपन्यांच्या उत्पादन सुविधा आहेत. येथे शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. व्हॅलिड पास, हेल्थ कोड आणि निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट असलेले कर्मचारीच या कालावधीत इकॉनॉमिक झोन सोडू शकतील. मात्र, 'विशेष वाहने' कामाच्या उद्देशाने सामान्यपणे प्रवास करण्यास सक्षम असतील.

शांघायच्या या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, कारण या महिन्यात वायव्येकडील झियान शहरात कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर 1 कोटी 30 लाख लोकांना आंशिक लॉकडाऊनमध्ये तात्पुरते कैद करण्यात आले. शुक्रवारी झियान शहरातील स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांना घराबाहेरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आणि कंपन्यांना या महिन्यात कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहण्याची परवानगी देण्यास प्रोत्साहित केले.

कोरोना महामारीच्या नियंत्रणामुळे सप्लाय चैनवर या नवीन निर्बंधांचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अॅपलसह इतर कंपन्यांच्या शिपमेंटला विलंब होण्याची शक्यता आहे. या निर्बंधांचा परिणाम यंदा देशाच्या आर्थिक विकास दरावरही होणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने शुक्रवारी संध्याकाळी मंद विकास दरामुळे बँकांच्या रोख रकमेत कपात केली.

शांघाय महामारीचे नवीन हॉटस्पॉट
शांघाय आणि आसपासच्या भागातील सप्लाय चैनमध्ये कामगारांनी पुन्हा काम सुरू न केल्यास पुढील महिन्यात वाहन उत्पादकांना उत्पादन थांबवावे लागेल, असे चिनी इलेक्ट्रिक कार निर्माता एक्सपेंगचे प्रमुख म्हणाले. तसेच, चीनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शांघाय शहर सध्या देशातील कोरोना महामारीचे नवीन हॉटस्पॉट आहे. शांघायमध्ये शनिवारी विक्रमी 3,590 लक्षणे नसलेली आणि 19,923 लक्षणे नसलेली प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

Web Title: corona explosion amid tight restrictions in china lockdown imposed in many other cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.