चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 07:48 PM2022-10-31T19:48:21+5:302022-10-31T19:49:17+5:30

चीनी सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे अॅपलच्या सर्वात मोठ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Corona in China | Lockdown again in China | Escape of employees from Apple's factory, Video goes viral... | चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल...

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल...

Next

Corona in China: जगात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असतील, पण चीनमध्ये कोरोना पुन्हा पाय रोवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळून येत आहेत. यामुळे तेथील सरकारकडून झिरो कोव्हिड पॉलिसीअंतर्गत निर्बंध आणि लॉकडाऊन लादले जात आहेत. झेंगझोऊ शहरातही हीच परिस्थिती आहे, ज्यामुळे अॅपलच्या कारखान्यातून कर्मचारी पळून जात आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


चीनमध्ये अॅपल आयफोन तयार करणारा फॉक्सकॉनचा सर्वात मोठा कारखाना आहे. सरकारने लादलेले निर्बंध टाळण्यासाठी या कारखान्यातील कामगार कंपाउंड वॉलवरुन उड्या मारुन पळ काढत आहेत. कोरोनाबाबत चीनी सरकारने लादलेले निर्बंध कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचा विषय ठरत आहेत. याचाच परिणाम म्हणून कर्मचारी कुंपनावरुन उड्या मारुन पळ काढत आहेत.

कर्मचाऱ्यांचे पलायन


चीनच्या मध्य हेनान प्रांतातील झेंगझोउ शहरातील फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये 200,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यांना काही काळापासून तेथे राहण्यास समस्या येत आहेत. शहरात कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अॅपलच्या या कारखान्यातील कामगार कारखान्यातून पळताना दिसत आहेत.

चीनची कोव्हिड झिरो पॉलिसी
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनच्या कोव्हिड झिरो पॉलिसीअंतर्गत जिथे-जिथे कोरोनाचे नवीन प्रकरण समोर येत आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन लागू केला जात आहे. या धोरणांतर्गत मोठी लोकसंख्या असलेल्या झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फॉक्सकॉनचा हा प्लांट बाधित जिल्ह्याच्या जवळ आहे. अशा स्थितीत प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच कोरोनाच्या निर्बंधांना सामोरे गेलेले लोक पुन्हा निर्बंध टाळण्यासाठी तेथून पळ काढत आहेत.
 

Web Title: Corona in China | Lockdown again in China | Escape of employees from Apple's factory, Video goes viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.