कोरोनाचे प्रगत देशातच थैमान! एप्रिलच्या 'त्या' १५ दिवसांमध्ये जगभरात एक लाख नागरिकांचा बळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:05 PM2020-04-29T17:05:23+5:302020-04-29T17:16:38+5:30

अमेरिका,स्पेन,इटली,फ्रान्स,इंग्लंड आदी देशांमध्ये मृत्यूने घातले थैमान

Corona is increasing in Advanced country! One lakh worldwide victims death in the 15 days of april month | कोरोनाचे प्रगत देशातच थैमान! एप्रिलच्या 'त्या' १५ दिवसांमध्ये जगभरात एक लाख नागरिकांचा बळी 

कोरोनाचे प्रगत देशातच थैमान! एप्रिलच्या 'त्या' १५ दिवसांमध्ये जगभरात एक लाख नागरिकांचा बळी 

googlenewsNext
ठळक मुद्देआशियातील देशांनी साधले नियंत्रण  जगभरात १० एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान बाधितांच्या संख्येत ११,२४,३५१ इतकी वाढ आगामी काळात अमेरिकेतील कोरोना मृतांची संख्या महिनाभरात लाखांपर्यंत जाण्याची शक्यतामृतांपेक्षा रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात जर्मनीने केली सर्वात चांगली कामगिरी

विकास चाटी- 
पुणे : जगभरात कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. मात्र प्रगत देशांमध्येच कोरोनाने थैमान घातले असून मृत व बाधितांच्या संख्येत त्यांचा वाटा खूप मोठा आहे. तुलनेने भारतीय उपखंडातील देशात बऱ्याच अंशी नियंत्रण साधले आहे.जगभरात १० एप्रिलला एक लाख रुग्णांचा (१००४४०) कोरोनाने मृत्यू झाला. मात्र त्यानंतर केवळ १५ दिवसांत त्यात (२५ एप्रिल - २०१५०१मृत ,वाढ-१०१०६१) आणखी एक लाख मृतांची वाढ झाली.अमेरिका,स्पेन,इटली,फ्रान्स,इंग्लंड आदी देशांमध्ये मृत्यूने थैमान घातले. एकट्या अमेरिकेत २७ एप्रिलपर्यंत कोरोना मृतांची संख्या ५६१८९ पर्यंत गेली आहे. इटली, स्पेन, जर्मनी व इंग्लंडमध्येही २० हजारांपेक्षाही जास्त मृत झाले.

१० एप्रिल ते २५ एप्रिलदरम्यान एकट्या अमेरिकेत ३२,९७२, स्पेन ६,५५४, इटली ७,१२०,फ्रान्स ९,०४८,जर्मनी ३,०४६,इंग्लंड १०,५४३ व इराण १,३४२ इतकी मृतांच्या संख्येत वाढ झाली. बाधितांच्या संख्येत अमेरिकेत ४,१४,४९५,स्पेन ६२,७११,इटली ४५,४१७, फ्रान्स ३४,९५९, जर्मनी ३४,५३५, इंग्लंड ६९,७०६ व इराण २०,००२ इतकी वाढ केवळ १५ दिवसांत झाली. जगभरात या पंधरा दिवसांत बाधितांच्या संख्येत ११,२४,३५१ इतकी वाढ झाली. त्यापैकी वरील ७ देशांतील एकुण बाधितांची संख्या ६,८१,८२५ इतकी म्हणजे ६१ टक्के इतकी आहे. पंधरा दिवसांतील जगभरातील एकुण मृतांच्या संख्येपैकी वरील ७ देशातील मृतांची संख्या ७०,६२५ म्हणजे ७० टक्के एवढी आहे. आर्थिक व वैद्यकीयदृष्ट्या प्रगत असुनही फाजील आत्मविश्वास व योग्यवेळी लॉकडाऊन न पुकारल्यामुळे ही परिस्थिती ओढवली.
१० एप्रिल ते २५ एप्रिल या पंधरा दिवसात बरे झालेले रुग्ण अमेरिकेत ६४,०७४,स्पेन ३६,६८७,इटली ३०,०४३, फ्रान्स १८,५६१ व जर्मनी ५४,३९३ इतकी आहे. जगभरात या काळात ४,०५,५४८ इतके रुग्ण बरे झाले. त्यात अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स व जर्मनी या पाच देशातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २,०३,७५८ इतकी साधारण ५० टक्के इतकी आहे. संबंधित १५ दिवसात अमेरिकेत सरासरी रोज ४,२७१ रुग्ण बरे तर सरासरी रोज २,१९८ रुग्ण मृत झाले. हेच प्रमाण स्पेनमध्ये सरासरी रोज २,४४५ रुग्ण बरे तर सरासरी रोज ४३६ रुग्ण मृत, इटली सरासरी रोज २,००० रुग्ण बरे तर सरासरी रोज ४७४ रुग्ण मृत, फ्रान्स सरासरी रोज १,२३७ रुग्ण बरे तर सरासरी रोज ६०३ रुग्ण मृत व जर्मनी सरासरी रोज ३,६२६ रुग्ण बरे तर सरासरी रोज २०३ रुग्ण मृत झाले. ज्या पद्धतीने कोरोना बाधितांची व मृतांची संख्या अमेरिकेत वाढत आहे, त्यावरुन कदाचित आगामी काळात अमेरिकेतील कोरोना मृतांची संख्या महिनाभरात लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत दहा लाख बाधित..
अमेरिकेत २७ एप्रिल अखेर कोरोनाबाधितांच्या संख्या ९,९९,७०६ होती. २८ एप्रिल अखेर ती १०,२२,२५९ इतकी झाली.  मृतांची संख्या अमेरिकेत २५ एप्रिलअखेर ५० हजार ३१६ होती , ती २८ एप्रिलअखेर ५७८६२ झाली. म्हणजे तीन दिवसात सरासरी अडीच हजारांनी वाढ झाली.  

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जर्मनीत चांगले..
मृतांपेक्षा रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात जर्मनीने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. सरासरी रोज मृत रुग्णांपेक्षा सरासरी रोज बºया रुग्णांचे प्रमाण जर्मनीत १८ पटीने जास्त आहे. तेच प्रमाण अमेरिका व फ्रान्समध्ये फक्त २ पट, स्पेन ५.५ पट, इटली ४ पट इतके आहे.
 
भारतीय उपखंडात चांगले नियंत्रण
आशिया खंडातील विशेषत: भारत, पाकिस्तान, बांगला देश व श्रीलंका या कमी प्रगत देशात घनदाट लोकसंख्येमुळे कोरोनाचे बळी प्रचंड असतील अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र १० एप्रिल ते २५ एप्रिल या पंधरा दिवसांत या देशातील बाधितांच्या संख्येत १२,९०७ वरुन ४१,९२१ इतकी वाढ झाली व मृतांच्या संख्येत ३४१ वरुन १,२४६ इतकी वाढ झाली. संबंधित पंधरा दिवसातील जगभरातील एकुण बाधितांच्या संख्येच्या वाढीत या चार देशांचा  वाटा फक्त २.५८ टक्के व मृतांच्या संख्येच्या वाढीत हा वाटा ०.०९ टक्के इतका आहे.
.........
 

Web Title: Corona is increasing in Advanced country! One lakh worldwide victims death in the 15 days of april month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.