Corona Omicron Update: कोरोना हवेतून कसा पसरतो? मास्क किती फायद्याचा? शास्त्रज्ञांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 08:49 PM2021-12-19T20:49:52+5:302021-12-19T20:50:33+5:30

Covid-19 Transmission through air: मास्क प्रभावी आहे याचा कोणताही निर्णायक पुरावा नाही. लोकांमधील व्हायरल लोडच्या भिन्नतेमुळे मास्कचे फायदे अचूक मोजणे कठीण आहे, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Corona Omicron Update: How does the corona spread through the air? How beneficial is the mask? Scientists said | Corona Omicron Update: कोरोना हवेतून कसा पसरतो? मास्क किती फायद्याचा? शास्त्रज्ञांनी सांगितले

Corona Omicron Update: कोरोना हवेतून कसा पसरतो? मास्क किती फायद्याचा? शास्त्रज्ञांनी सांगितले

Next

लंडन: कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जगभरातील लोक गेल्या दोन वर्षांपासून मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी तरसत आहेत. कोरोनाचा एकामागोमाग एक व्हेरिअंट येत आहे. ओमायक्रॉन तर डेल्टापेक्षा 70 पटींनी पसरणारा आहे. हा कोरोना व्हायरस हवेतून कसा पसरतो यावर यूनिवर्सिटी कॉलेज लंडनचे पर्यावरण इंजिनिअरिंग असोसिएट प्रोफेसर लीना सिरिक, यूनिवर्सिटी ऑफ शेफील्ड वरिष्ठ लेक्चरर अबीगैल हैथवे आणि यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंघमचे आर्किटेक्चर अँड बिल्ट एन्वायरमेंट डिपार्टमेंटचे प्रोफेसर बेंजामिन जोन्स यांनी संशोधन केले. 

जगभरातील लोकांना आता मास्क घालून फिरणे सामान्य वाटू लागले आहे. आम्ही मास्क परिणामकारक आहे की नाही यावर अभ्यास करत आहोत. कोरोना व्हायरस हवेद्वारे कसा पसरतो, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखले जाऊ शकेल. मास्क हवेतून निघालेले कण नियंत्रित करू शकतो का हे आम्हाला शोधायचे असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

जेव्हा आम्ही बोलतो, खोकतो किंवा श्वास घेतो तेव्हा आपल्या तोंड आणि नाकाद्वारे हवा बाहेर पडते. यावेळी फुफ्फुस, गळा आणि तोंडातून श्वसन तरंगणारे कण एकत्र करते आणि त्याव्दारे या हवेतील थेंबांचे निर्माण होते. हे थेंब हवेत सोडले जातात. खोकणे किंवा बोलण्यासाठी जी शक्ती खर्ची पडते त्यातून हे कण तयार होतात. अधिकतर कण हे पाय मायक्रॉनपेक्षाही कमी असतात, ज्याला आपण एअरोसोल म्हणतो. यापेक्षा मोठा थेंब हा 100 मायक्रॉन एवढा मोठा असू शकतो. हे एअरोसोल तासंतास हवेत तरंगत असतात आणि ते संक्रमण पसरवू शकतात. 

लोकांमधील व्हायरल लोडच्या भिन्नतेमुळे मास्कचे फायदे अचूक मोजणे कठीण आहे, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. मास्क वापरणाऱ्या संक्रमित व्यक्तीद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या व्हायरसचे प्रमाण कमी होते. मात्र, मास्कची किती मदत मिळते हे तो व्यक्ती किती प्रमाणात व्हायरस सोडतो त्यावर अवलंबून आहे, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

मास्क प्रभावी आहे याचा कोणताही निर्णायक पुरावा नाही. मास्क घातल्याने कोरोना व्हायरस होण्यापासून किती जण वाचले आहेत, याची अचूक माहिती नसली तरी मास्क काही प्रमाणावर व्हायरस असलेले एअरोसोल नक्कीच अडवत असतील. यामुळे संक्रमणाची संख्या कमी होण्यास मदत मिळते, असा दावा या तज्ज्ञांनी केला आहे.

Web Title: Corona Omicron Update: How does the corona spread through the air? How beneficial is the mask? Scientists said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.