CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनापुढे अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 04:44 PM2020-11-09T16:44:23+5:302020-11-09T16:53:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.

corona outbreak in america highest number of 10 million infected country covid 19 | CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनापुढे अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनापुढे अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 50,815,027 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,263,111 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या दहा दिवसांत एक लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी अमेरिकेत 131,420 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक संख्या असल्याची माहिती 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिली आहे. 

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला 5 कोटींचा टप्पा, 1,263,111 लोकांनी गमावला जीव

अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख 37 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात कोरोनामुळे 12 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मार्टफोनमार्फत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याची आता माहिती मिळणार आहे. लक्षणं नसलेल्या व्यक्तींची देखील यामुळे माहिती मिळणार आहे. 

फक्त खोकल्याचा आवाजावरून स्मार्टफोन सांगणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; रिसर्चमधून दावा

फक्त खोकल्याच्या आवाजावरून कोरोना झाला आहे की नाही हे समजणार आहे. संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) च्या मदतीने एक मॉडेल विकसित केलं असून त्यामध्ये लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना ओळखण्याची देखील क्षमता आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये विकसित करण्यात आलेलं तंत्रज्ञान केवळ खोकल्याच्या आवाजावरून एखादी व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे सांगतं. कोरोना चाचणीसाठी येणारा खर्च हा अधिक आहे. तसेच चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे समजण्यासाठीही बराच वेळ लागतो. मात्र या तंत्रज्ञानामुळे आता कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा स्मार्टफोनवर एका अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल. अमेरिकेतील मॅसात्सूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी (Massachusetts Institute of Technology - MIT) कोरोना टेस्टसाठी एक असं आर्टिफिशिअल इंटेलेजन्स मॉडेल तयार केलं आहे. 

Web Title: corona outbreak in america highest number of 10 million infected country covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.