या देशात कोरोनाची संख्येत मोठी वाढ, पंतप्रधान म्हणाले मी निराश झालोय.......
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 02:18 PM2020-05-28T14:18:05+5:302020-05-28T14:20:56+5:30
कोरोनाचा दिवसेंदिवस धोका वाढत आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढतच आहे. कॅनडामध्ये कोरोनामुळे ८० टक्के म्हणजे ६५०० मृत्यू केअर होम्समध्ये झाले आहेत. आँटेरियो सरकारने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. आँटेरियाचे मुख्य डग फोर्ड यांनी हा अहवाल दिला आहे. यात म्हटले आहे की, ज्या केअर होम्समध्ये हे मृत्यू झाले तेथे अस्वच्छता होती. ज्येष्ठांना अनेक आठवडे अंघोळ करता आली नव्हती. जेवायला मिळत नव्हते. अंथरूण घाण होते.
ज्येष्ठ नागरिक जीव वाचवण्यासाठी विनंती करायचे, मात्र त्यांची कोणीच मदत केली नाही. सर्वात वाईट स्थिती आँटेरियो आणि क्युबेक राज्यांतील केअर होम्सची आहे. येथे लष्कर तैनात केले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी स्थिती बघून त्रस्त झाल्याचे म्हटले आहे. कॅनडात आतापर्यंत ८६६४७ रुग्ण आढळले आहेत, तर आँटेरियो प्रशासनाच्या अहवालानुसार ८१२५ मृत्यू झाले आहेत.
कोरोनाचा दिवसेंदिवस धोका वाढत आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांत अचानक ती वाढू शकतात. यामुळे फक्त पाहत न बसता सरकारांनी महामारी रोखण्याच्या उपाययोजनांसोबत तयार राहावे. साथीचे रोग लाटेच्या स्वरुपात येतात. यामुळे ज्या भागांत प्रकरणे कमी झाली, त्या क्षेत्रात ही लाट पुन्हा येऊ शकते. सध्या सुरू असलेल्या संसर्गाची पहिली फेरी थांबविली गेली तरी पुढच्या वेळी संसर्गाचे प्रमाण खूप वेगवान असू शकते.