'या' देशात दारू पिणाऱ्यांमुळे पसरला कोरोना? आता टेस्टसाठी लागतायत लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:33 PM2022-06-13T17:33:57+5:302022-06-13T17:36:01+5:30
Corona Virus in China: चीनमध्ये टेस्टिंग सेंटर्सबाहेर 100 मीटरहूनही अधिक लांब रांगा दिसत आहेत. या दरम्यान निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बॅरिकेटिंगदेखील करावे लागले.
कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली, असे सातत्याने बोलले जाते. आता येथे पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये लाखो लोकांनाची कंपलसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. यावरूनच, चीनमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या, ही पुन्हा एकदा सरकारची डोके दुखी वाढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टेस्टिंग सेंटर्सबाहेर लांबच लांब रांगा -
रॉयटर्स वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये टेस्टिंग सेंटर्सबाहेर 100 मीटरहूनही अधिक लांब रांगा दिसत आहेत. या दरम्यान निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बॅरिकेटिंगदेखील करावे लागले.
दारू पिणाऱ्यांनी पसरवला कोरोना? -
चिनी प्रशासनाने गेल्या आठवड्यात डाइन-इन वरील बंदी हटवली. यानंतर, हेवन सुपरमार्केट बारमध्ये दारू घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांनी अचानक केलेल्या या गर्दीने कोरोनाच्या मोठ्या हबचे काम केले आणि आता हीच गर्दी कोरोना व्हायरस पसरण्याचे कारण ठरत असल्याचे बोलले जाते.
वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंतेचा विषय -
कोरोना रुग्ण संख्येत अचानकपणे होत असलेली ही वाढ जगभरासाठी चिंतेचा विषय आहे. कारण, रुग्णवाढ कुठल्याही देशात झाली, तरी तिचा परिणाम सर्वांवरच होत असतो.