कोरोना : चीनमध्ये १३ शहरांत प्रवासावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 05:33 AM2020-01-25T05:33:43+5:302020-01-25T05:34:52+5:30
चीनमध्ये कोरोना विषाणूची धास्ती वाढत असून, चीनने १३ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा ४.१ कोटी लोकांना फटका बसला आहे
बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूची धास्ती वाढत असून, चीनने १३ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा ४.१ कोटी लोकांना फटका बसला आहे, तर या विषाणूूंंचा ८८० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.
चीनच्या हुबेई प्रांताच्या जिंगझोऊमध्ये सर्वात प्रथम हा विषाणू आढळला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातून जाणाºया सर्व रेल्वे सेवा आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सकाळी ४ वाजता बंद राहील, तर सार्वजनिक बस, पर्यटन बस फेºया व अन्य नौका सेवा अस्थायी स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत.
हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
७00 भारतीय विद्यार्थी चीनमध्ये
चीनमधील विषाणूंच्या प्रसाराने भारताची काळजीही वाढली आहे. कारण, जवळपास ७०० भारतीय विद्यार्थी वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात. बहुतांश विद्यार्थी चीनच्या विद्यापीठात शिकत आहेत.
चीनमध्ये कोरोना विषाणूंच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार दहा दिवसांच्या आत नवे हॉस्पिटल उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. हे हॉस्पिटल २५ हजार स्क्वेअर मीटरमध्ये आणि १००० बेडचे असणार आहे.
या विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे सरासरी वय ७३ वर्षे आहे. मृतांमध्ये सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ८९ वर्षांची आहे. तर सर्वात कमी वयाची व्यक्ती ४८ वर्षांची आहे.
भारतीय दूतावासाने कार्यक्रम केला रद्द
चीनमध्ये पसरलेल्या कोराना विषाणूंमुळे बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने प्रजासत्ताक दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.
या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
दूतावासाने टष्ट्वीट केले आहे की, भारतीय दूतावासाने २६ जानेवारीला आयोजित केलेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.