Corona Vaccination : अमेरिकेत पुढच्या महिन्यापासून मोफत बुस्टर डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:46 AM2021-08-20T07:46:42+5:302021-08-20T07:58:09+5:30
Corona Vaccination : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, हा बुस्टर डोस मोफत असेल आणि लसीचे डोस घेऊन आठ महिने झालेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जाईल.
Next
वाॅशिंग्टन : अमेरिकेत पुढच्या महिन्यापासून कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा अतिरिक्त डोस (बुस्टर डोस) देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, हा बुस्टर डोस मोफत असेल आणि
लसीचे डोस घेऊन आठ महिने झालेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जाईल. अन्न व औषधी प्रशासनाची मंजुरी बाकी असल्याने
२० सप्टेंबरपासून बुस्टर डोस उपलब्ध होईल.
जगातील अनेक देश पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत असल्याने अमेरिकेने बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतल्यावरून टीका होत आहे. इतर देशांना पहिला डोस मिळेपर्यंत अमेरिकेला तिसरा डोस मिळू
नये, असे काही जागतिक नेत्यांचे म्हणणे आहे.