Corona Vaccination: ...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतला कोरोनाविरोधातील लसीचा  डोस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 10:26 AM2021-12-24T10:26:27+5:302021-12-24T10:27:27+5:30

Corona Vaccination News: एका व्यक्तीने इतरांना बनावट सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी तब्बल आठवेळा कोरोनाविरोधातील लस घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे आठ वेळा कोरोना विरोधातील लसीचा डोस घेऊनही या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम झाला नाही.

Corona Vaccination: ... So he took the dose of Corona Vaccine eight times, the effect on his health. | Corona Vaccination: ...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतला कोरोनाविरोधातील लसीचा  डोस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम

Corona Vaccination: ...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतला कोरोनाविरोधातील लसीचा  डोस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम

Next

ब्रुसेल्स - युरोपियन देश बेल्जियममध्ये कोरोना लसीकरणामधील अफरातफरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार येथे एका व्यक्तीने इतरांना बनावट सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी तब्बल आठवेळा कोरोनाविरोधातील लस घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे आठ वेळा कोरोना विरोधातील लसीचा डोस घेऊनही या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम झाला नाही. दरम्यान, नवव्यांदा लस घेण्यासाठी गेला आसताना त्याला अटक करण्यात आली.

समोर आलेल्या वृत्तानुसार हा प्रकार वलून प्रांतातील दोन लाख लोकसंख्या असलेल्या शॉर्लरॉय शहरामध्ये घडला आहे. आरोपी व्यक्तीला पैसे घेऊन इतरांऐवजी लस घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बेल्जियममधील लावेनिर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तींना लस न घेता सर्टिफिकेट हवे होते, अशा व्यक्तींच्या संपर्कात आरोपी होता. अशा व्यक्तींकडून घसघशीत रक्कम घेऊन तो लस घेण्यासाठी जात असे. दरम्यान, बेल्जियमच्या पोलिसांनी  आरोपी आणि त्याला लस घेण्यासाठी पैसे देणाऱ्या लोकांची नावे जाहीर केलेली नाहीत.

बेल्जियममध्ये आतापर्यंत कोरोनाचे २० लाख १७ हजार रुग्ण सापडले आहेत. यामधील १५ लाख ५३ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४ लाख ३५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. सुमारे २७ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका विचारात घेऊन बेल्जियममध्ये २६ डिसेंबरपासून निर्बंध वाढणार आहेत.

Web Title: Corona Vaccination: ... So he took the dose of Corona Vaccine eight times, the effect on his health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.