Corona Vaccination : जगभरात ८०६ दशलक्ष लोकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 01:00 AM2021-04-14T01:00:33+5:302021-04-14T01:00:50+5:30

Corona Vaccination: बांगलादेशात ६१७२१५९, म्यानमारमध्ये १०४००००, इराकमध्ये १५२९६२, इराणमध्ये ३१९८९०, तर पाकिस्तानमध्ये आठ लाख लोकांना ही लस दिली गेली आहे.

Corona Vaccination: Vaccination of 806 million people worldwide | Corona Vaccination : जगभरात ८०६ दशलक्ष लोकांचे लसीकरण

Corona Vaccination : जगभरात ८०६ दशलक्ष लोकांचे लसीकरण

Next

संयुक्त राष्ट्रे : संपूर्ण जगभरात १४ डिसेंबरपासून ते १२ एप्रिलपर्यंत ८०६ दशलक्षांपेक्षा जास्त कोरोना लसीच्या मात्रा (डोस) लोकांना दिल्या गेल्या आहेत. तरीही वेगवेगळ्या देशांत अनेक जण असे आहेत की, त्यांनी अजून एकही मात्रा घेतलेली नाही. अमेरिकेत १८९६९२०४५ जणांना, तर रशियात १४२६९५४३ जणांना लस दिली गेली आहे. इस्रायलमध्ये १०२७९७५१, ब्राझीलमध्ये २७४३२९९४, इंडोनेशियात १५६०२५७४, संयुक्त अरब अमिरातमध्ये ९०३७९२३, भूतानमध्ये ४७५६५१, इंग्लंडमध्ये ३९८४६७८१, नेपाळमध्ये १६०००००, श्रीलंकेत ९२५२४२, बांगलादेशात ६१७२१५९, म्यानमारमध्ये १०४००००, इराकमध्ये १५२९६२, इराणमध्ये ३१९८९०, तर पाकिस्तानमध्ये आठ लाख लोकांना ही लस दिली गेली आहे.

लसीची दुसरी मात्रा घेतलेल्यांची टक्केवारी
अमेरिकेत २२, इस्रायलमध्ये ५६, ब्राझीलमध्ये ३, इंडोनेशियात २, इंग्लंडमध्ये १२, रशियात ३.८, बांगलादेशात ०.३, तर म्यानमारमध्ये ०.१ 

Web Title: Corona Vaccination: Vaccination of 806 million people worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.