Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 09:22 PM2021-06-25T21:22:21+5:302021-06-25T21:24:20+5:30
Who needs COVID-19 boosters?: या डॉक्यूमेंटसमध्ये लस उत्पादन करण्याची समस्या, प्राधिकरण परवाने, काही तांत्रिक अडचणी यांचा अंदाज घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या लसींचे लक्ष्य गाठण्यासाठी काही समस्या येऊ शकतात.
संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाच्या बदलत्या व्हेरिएंट आणि त्यावर लसीचा होणारा प्रभाव पाहता तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटना(WHO) त्यांनी एका रिपोर्टनुसार अंदाज लावला आहे की, ज्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे, त्यात वृद्ध असतील अशांना कोरोना व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी प्रत्येक वर्षाला बुस्टर डोस घेण्याची गरज भासू शकते असं WHO नं म्हटलं आहे.
रॉयटर्स बातमीनुसार, WHO नं लसींबाबत चर्चा करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केले होते. WHO च्या कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाची COVAX ही सहकारी संघटना आहे. लस उत्पादक मॉडर्ना इंक आणि फायझर इंक त्यांचे जर्मन भागीदार बायोएनटेक यांच्यासह बूस्टर शॉटच्या आवश्यकतेबाबत जोर देताना दिसून आले. या कंपन्यांचे म्हणणं आहे की, बूस्टर शॉट उच्चस्तरीय इम्यूनिटी बनवण्यासाठी मदत करते. परंतु हे किती प्रभावी ठरेल हे आता सांगणं कठीण आहे. रिपोर्टमध्ये WHO नं जास्त जोखीम असणाऱ्या लोकांना वर्षाला बूस्टर आणि सामान्य लोकांना प्रत्येक २ वर्षाला बूस्टर शॉट देण्याची शिफारस केली आहे.
परंतु WHO या निष्कर्षापर्यंत कसं पोहचलं हे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं नाही. रिपोर्टनुसार व्हेरिएंट नवनवे रुप बदलत राहील. या धोक्यापासून वाचण्यासाठी लसीमध्ये नियमित रुपात अपडेट केले जाईल. गावीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, COVAX अनेक पद्धतीने प्रभावीपणावर लक्ष ठेवण्याची योजना बनवत आहे. ८ जूनच्या या डॉक्यूमेंटमध्ये पुढील वर्षापर्यंत जागतिक स्तरावर १२ अब्ज डोस उत्पादन करण्याचं टार्गेट ठेवले आहे. या डॉक्यूमेंटसमध्ये लस उत्पादन करण्याची समस्या, प्राधिकरण परवाने, काही तांत्रिक अडचणी यांचा अंदाज घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या लसींचे लक्ष्य गाठण्यासाठी काही समस्या येऊ शकतात.
त्याचसोबत बूस्टर डोस आणि लसींबाबत अंदाज बदलू शकतात. आतापर्यंत जगभरात लसीचे २५० कोटी डोस दिले गेले आहेत. श्रीमंत देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला कमीत कमी लसीचा एक डोस दिला आहे. तर गरीब देशांमध्ये १ टक्क्याहून कमी लसीकरण झालं आहे. WHO च्या अंदाजाप्रमाणे, लसीचे वाटप पुढील वर्षापर्यंत आणखी वाढू शकते. कारण वार्षिक बूस्टर डोसची आवश्यकता पुन्हा एकदा गरीब देशांना मागे टाकेल. सर्वाधिक वाईट अवस्थेत पुढील वर्षी ६०० कोटी लस उत्पादन केले जाऊ शकते असं WHO ने म्हटलं आहे.
अंदाजानुसार, संपूर्ण जगाला प्रत्येक वर्षी बूस्टरची गरज भासू शकते जेणेकरून कोरोनाच्या व्हेरिएंटसोबत मुकाबला केला जाईल. सुरक्षेची हमी आणखी वाढवता येईल. अशावेळी लसीचा पहिला डोस घेण्याची गरज आणखी वाढू शकते. परंतु तज्ज्ञ म्हणतात की, जगभरातील मागणीप्रमाणे लसीच्या उत्पादनाचा पुरवठा केला जाऊ शकतो अशी आशा आहे. या लसी जगभरात पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच कदाचित बूस्टरची गरज भासणार नाही कारण अपडेटेड लस व्हेरिएंटविरोधात चांगली प्रभावी ठरतील