निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 02:26 PM2021-12-06T14:26:07+5:302021-12-06T14:38:49+5:30
नवजात बालकांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे.
ब्राझीलमध्ये एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. दोन नवजात बालकांना चुकून कोरोना व्हायरसची लस दिल्याची घटना घडली आहे. लस दिल्यामुळे त्या बाळांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. बाळांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला तात्पुरते निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
ब्राझीलच्या मीडियात आलेल्या वृत्तानुसार, बाळांना डायरिया, टिटॅनस कफ आणि हिपॅटायटीसची लक्षणे होती. त्यांना या आजारांची लस देण्याऐवजी दोन महिन्यांची मुलगी आणि चार महिन्यांच्या मुलाला चुकून फायझर लसीचा डोस देण्यात आला. लस दिल्यानंतर दोघांनाही गंभीर रिअॅक्शन झाली आणि तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
ही बाब उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फाइझर लस 5 वर्षाखालील मुलांसाठी अनेक देशांमध्ये मंजूर करण्यात आली आहे. त्याच वेळी, ब्राझीलच्या आरोग्य नियामक अन्विसा यांनी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी जूनमध्ये Pfizer/BioNtech Covid-19 लस मंजूर केली. यादरम्यानही बराच वाद झाला, कारण अन्विसाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सुरुवातीला ब्राझीलमध्ये लसीकरणाबाबत लोकांमध्ये प्रचंड संकोच होता. त्यामागील कारण म्हणजे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी लसीबाबत दिलेले विधान. बोल्सोनारो यांनी लस दिल्यानंतर प्राण्यात रुपांतर होण्यासारखे विधान केले होते. याशिवाय 24 ऑक्टोबर रोजी ते म्हणाले होते की, ब्रिटिश सरकारच्या अधिकृत अहवालात असे म्हटले आहे की, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांना 'अॅक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम' (एड्स) होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे विधान त्यांनी केले होते.