Corona vaccine : कोरोनाविरोधात केवळ एक डोस पुरेसा ठरणार, १८ वर्षांवरील व्यक्तींना देता येणार, या कंपनीच्या लसीला मिळाली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:12 AM2021-03-12T11:12:00+5:302021-03-12T11:18:50+5:30

Corona vaccine News : आता एक अशी लस उपलब्ध झाली आहे जिचा केवळ एकच डोस कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (EU approved Johnson & Johnson's vaccine)

Corona vaccine: Only one dose of corona will be sufficient, can be given to persons above 18 years of age, EU approved Johnson & Johnson's vaccine | Corona vaccine : कोरोनाविरोधात केवळ एक डोस पुरेसा ठरणार, १८ वर्षांवरील व्यक्तींना देता येणार, या कंपनीच्या लसीला मिळाली मान्यता

Corona vaccine : कोरोनाविरोधात केवळ एक डोस पुरेसा ठरणार, १८ वर्षांवरील व्यक्तींना देता येणार, या कंपनीच्या लसीला मिळाली मान्यता

Next
ठळक मुद्देजॉन्सन अँड जॉन्सनने ही लस विकसित केली आहे. या लसीला युरोपीयन युनियनच्या औधष नियामकाने मान्यता दिली आहेफायझर-बायोएनटेक, एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मॉडर्नाच्या लसींनंतर युरोपियन युनियनकडून मान्यता मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही कोरोनावरील चौथी लस कोरोनावरील इतर लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मात्र या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागणार

ब्रुसेल्स - एकीकडे जगभरातील कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत चढउतार होत असताना दुसरीकडे कोरोनावरील  लसीही (Corona vaccine ) आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश कोरोना लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मात्र आता एक अशी लस उपलब्ध झाली आहे जिचा केवळ एकच डोस कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (Johnson & Johnson's Covid-19 vaccine)  जॉन्सन अँड जॉन्सनने ही लस विकसित केली आहे. या लसीला युरोपीयन युनियनच्या औधष नियामकाने मान्यता दिली आहे.  (Corona vaccine: Only one dose of corona will be sufficient, can be given to persons above 18 years of age, EU approved Johnson & Johnson's vaccine )

फायझर-बायोएनटेक, एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मॉडर्नाच्या लसींनंतर युरोपियन युनियनकडून मान्यता मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही कोरोनावरील चौथी लस ठरली आहे. कोरोनावरील इतर लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मात्र या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागणार आहे.  तसेच १८ वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. 

युरोपियन मेडिसिन एजन्सी (ईएमए)च एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एमर कूक यांनी सांगितले की, या लसीला मान्यता मिळाल्यामुळे युरोपियन युनियनमधील देशांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि आपल्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक अतिरिक्त पर्याय प्राप्त होणार आहे. ईएमएनंतर युरोपियन कमिशननेसुद्धा लसीला अंतिम मंजुरी दिली आहे. अमेरिका, कॅनडा आणि बहरीनमध्येसुद्धा जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. 
 
 जॉन्सन अँड जॉन्सनचे मुख्य सॅंटिफिक ऑफिसर पॉल स्टोफेल्स यांनी कंपनीसाठी हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. कंपनीने ईयूसह यावर्षी किमान २० कोटी डोसची पूर्तता करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. 

Web Title: Corona vaccine: Only one dose of corona will be sufficient, can be given to persons above 18 years of age, EU approved Johnson & Johnson's vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.